सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांचा शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर येथे ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) या संस्थेने आयोजित केलेला ‘युनिव्हर्सल वन-नेस सेलिब्रेशन’ (Universal One-ness Celebration) कार्यक्रम जसजसा जवळ येत चालला आहे… तसतसा त्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या विघ्नसंतोषी संस्था चेकाळत चालल्या आहेत…
मा. डॉ. मोहनजींचा व्हिसा रद्द करावा… इथपासून संघप्रणित अमेरिकेतील संस्थांवर बंदी घालावी… हा कार्यक्रम रद्द करावा अशा अनेक मागण्या या दळभद्री संस्था सातत्याने करत आहेत… अगदी त्यासाठी निदर्शने करणे देखील सुरु आहे…
आणि त्यांचा विरोध म्हणजे जणू अमेरिकन सरकारचा विरोध… अमेरिकेच्या संपूर्ण जनतेचा विरोध असा आभास मिडीया सोशल मीडियावर भारतात उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्याकडचे शतमूर्ख डावे… पुरोगामी… लिब्रांडू… सोरोसचे मानसपुत्र करत आहेत…
भारतातील या सगळ्या नतद्रष्ट मंडळींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही माथी मारलेल्या गांधीहत्येच्या खोट्या आरोपातून… आणि ३ वेळा घातलेल्या बंदीतून ५२ कशी सोन्यासारखी तावून सुलाखून आज आपली शताब्दी साजरी करत असलेली संघटना आहे हे माहित नाही का?… असला पुचाट विरोध संघ आपल्या खिजगणतीत धरत नाही इतके प्रहार संघाने सोसले आहेत आणि तरीही तो नुसता ताठ मानेने उभा नाही तर दिवसागणिक बहरतो… फुलतो आणि फळतो आहे… अधिकाधिक वृद्धिंगत होतो आहे…
आज भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात… आणि ज्यांचे अमेरिकन सरकार सोबत उत्तम राजनयिक संबंध आहेत… त्याच विचारधारेचे मा. डॉ. मोहनजी भागवत सर्वोच्च नेते/अधिकारी आहेत… तर मग अमेरिकन सरकार त्यांचा व्हिसा कसा रद्द करेल ?…
त्यातून जर व्हिसा रद्द करायचाच असता तर तो देण्यापूर्वीच नाकारला गेला असता… पण मा. डॉ. मोहनजी हे अमेरिकन नागरिकांनी स्थापन केलेल्या AHEAD या एका अमेरिकन संस्थेच्या निमंत्रणावरून तेथे गेले आहेत… जगभर आपल्या लोकशाही… व्यक्ति स्वातंत्र्य… Freedom of Speech चा जगभर डंका वाजवणाऱ्या अमेरिकन सरकारला आपल्याच नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे जड गेले असते…
आणि ‘युनिव्हर्सल वन-नेस सेलिब्रेशन’ हे त्या कार्यक्रमाचे नाव आहे यावरून तरी कार्यक्रमाचा उद्देश किती व्यापक… आणि सर्वव्यापी आहे हे तरी विरोध करणाऱ्या उपद्रव्यांच्या लक्षात यायला हवे होते… पण दुर्दैवाने ते आले नाही किंवा ते लक्षात घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाहीये…
शिवाय संघाला अतिरेकी किंवा दहशतवादी संघटना म्हणून ठरवण्याचे अनेक प्रयत्न भारतात झाले आहेत मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये यातील कोणताही प्रयत्न टिकू शकला नाही… उदाहरणच द्यायचे झाले तर गांधी हत्येच्या आरोप पत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव देखील नव्हते…
उलट भारताची जनता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समाजातली देशभक्ती जागृत करणारी… नैसर्गिक संकटाच्या वेळी धावून जाणारी… समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात अथक परिश्रमाने परंतु मूकपणाने निःशब्द क्रांती घडवून आणणारी एक सेवाभावी संस्था म्हणून ओळखते… जर भारतातील मातृसंस्थाच इतकी तेजपुंज असेल तर मग कोणत्या आधारावर ही बेशरम मंडळी अमेरिकेतील संघप्रणित संस्थांवर बंदी घालावी म्हणून मागणी करत आहे?…
मा. डॉ. मोहनजींचा मॅडिसन स्क्वेअर मधील कार्यक्रम रद्द व्हावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या या दीड दमडीच्या मंडळींचा शेवटचा आधार होता तो म्हणजे न्यू यॉर्कचे महापौर जोहरान ममदानी… ममदानी यांनी देखील सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला आपला विरोधच आहे असे सांगून आपली मज़हबी मानसिकता उघडपणे दाखवून दिली… त्यामुळे या मंडळींच्या आशा अजून पल्लवीत झाल्या…
पाश्चिमात्य देशांमध्ये एखाद्या शहराच्या महापौराला तसे खूप अधिकार असतात हे खरे असले तरी… एखाद्या अमेरिकन संस्थेच्या जाहीर कार्यक्रमावर बंदी घालण्याएवढे ते निश्चितच नाहीत…
आणि अगदी त्याच बरहुकूम जोहरान ममदानी यांनी आपल्याला तसे अधिकार नाहीत असे स्पष्टपणे सांगून हात वर केले…
त्यामुळे देव पाण्यात घालून बसलेल्या या मंडळींवर चुल्लूभर पाण्यात बुडून जीव द्यायची वेळ आली…
अगदीच काही नाही तर… हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या AHEAD संस्थेचे X अकाउंट त्या प्लॅटफॉर्मने ब्लॉक केले अशी आवई उठवण्यात आली… आणि आपल्याकडची पाप्याची पितरं आनंदाने माकडासारखी उड्या मारू लागली…
प्रत्यक्षात विरोधकांनी ‘X’ च्या अल्गोरिदमचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात बॉट्सद्वारे (Bots) अकाऊंट रिपोर्ट केले होते… त्यामुळे सिस्टीमने ते आपोआप ब्लॉक केले होते… हे लक्षात आल्याबरोबर ‘X’ च्या सपोर्ट टीमने तातडीने कारवाई करत काही तासांतच हे खाते पुन्हा सुरू केले… “एक गधा ढूंढने निकले तो सौ मिलते हैं” अशी केविलवाणी स्थिती या गाढवांची झाली…
संघ संस्कारीत कार्यकर्त्यांनी आखलेली योजना किती चोख असते त्याचे प्रत्यंतर गेली १०० वर्षे येत असूनही… हिंदुद्वेष्ट्या मंडळींना अजूनही सरसंघचालकांचा कार्यक्रम रद्द होण्याची आशा वाटते आहे… जोहरान ममदानी यांच्या सकट त्या सगळ्या दीड शहाण्यांना आम्ही एकच गोष्ट सांगू इच्छितो…
“मेडिसन स्क्वेयर आ रहे हैं हम… गुदे भर का जोर लगा लो…
और उखाड़ लो जो उखाड़ सकते हो”…
भारत माता की जय