Saturday, August 29, 2026

राम मंदिरातील दानचोरीचे राजकारण करणाऱ्यांना चपराक!

Share

श्रद्धा चोरीला जात नाही, ती अधिक दृढ होते…..

राम मंदिरातील दान चोरीची घटना समोर आल्यानंतर काही मंडळींनी त्याचा आधार घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणे, चौकशीची मागणी करणे किंवा दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करणे यात काही गैर नाही. परंतु या घटनेचे निमित्त करून श्रीराम मंदिराबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा किंवा भक्तांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच वेगळ्या गलिच्छ राजकारण आहे.

या राजकारणाला अयोध्येतूनच एका रामभक्त महिलेने दिलेले उत्तर अत्यंत बोलके आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून अयोध्येत आलेल्या एस. नागलक्ष्मी या महिला भक्ताने राम मंदिराला १० हजार रुपयांची देणगी दिली आणि मंदिर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. मंदिरातील सुविधा सुधाराव्यात आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावेत, अशी सुचनाही त्यांनी केली आहे. दानचोरीच्या प्रकरणामुळे रामभक्तांची श्रद्धा कमी झाली नाही. उलट, प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच राम मंदिरातील दैनंदिन देणग्या जवळपास दुप्पट झाल्याचे वृत्त समोर आले. म्हणजेच काही लोकांनी ज्या घटनेचे राजकारण करून रामभक्तांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न केला, त्याला भाविकांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले.”

त्याचबरोबर बँकींग आणि श्रीराम जन्मभूमी मंदीर ट्रस्ट माहितीवरुन उन्हाळ्यापुर्वी दैनंदिन जमा होणारी देणगी 10 ते 12 लाख होती. आता ती वाढुन 20 ते 24 लाख दैनंदिनपर्यत पोहोचली आहे. एकीकडे राजकारण, दुसरीकडे श्रद्धेची सेवा मंदिरातील एका गैरप्रकाराची बातमी समोर आली म्हणून काही जणांनी त्यातून मंदिराविषयी नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हजारो किलोमीटर दूर असलेल्या कोईम्बतूर मधील एका रामभक्त महिलेने अयोध्येत येऊन केलेली कृती त्या सर्व राजकारणाला अक्षरशः उत्तर देते. नागलक्ष्मी यांनी केवळ दर्शन घेतले नाही, तर मंदिराच्या व्यवस्थेबद्दल विचार केला. कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार केला. मंदिरातील सुविधा अधिक चांगल्या व्हाव्यात यासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. ही मानसिकता आणि राजकारणातील मानसिकता यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. रामभक्तांसाठी मंदिर म्हणजे केवळ दगडांची वास्तू नाही. ते श्रद्धेचे, संस्कृतीचे आणि भावविश्वाचे केंद्र आहे. म्हणून एखाद्या चोरीच्या घटनेमुळे त्यांची श्रद्धा संपत नाही. उलट अशा घटनांनंतर व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम व्हावी, अशी त्यांची अपेक्षा असते. रामलल्लाची सेवा म्हणजेच कर्मचाऱ्यांचीही सेवा नागलक्ष्मी यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी देणगीचा उपयोग व्हावा, अशी भूमिका मांडली.


ही भावना समजून घेण्याची गरज आहे. दानचोरी झाली म्हणून दान बंद झाले नाही. एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे भक्तांची श्रद्धा संपत नाही.ती एखाद्या गैरप्रकाराने ढळत नाही.उलट संकटाच्या काळात ती आणखी दृढ होते.आणि म्हणूनच दानचोरीच्या एका घटनेवरून राम मंदिराच्या श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांच्या कानफडात नागलक्ष्मी यांच्या या कृतीची हीच खरी चपराक आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख