Wednesday, September 9, 2026

आध्यात्मिक चित्रपटांची जोरदार कमाई…

Share

अध्यात्म, भक्ती आणि पौराणिक कथांना बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ‘हनुमान अंश’च्या यान अधोरेखित केले आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे बजेट सुमारे २  कोटी रुपये असून, बिग बजेट सिनेमांना मात दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ७ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ने सोमवारपर्यंत बॉक्स ऑफिसवर १५० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे वृत्त आहे. मोठे कलाकार किंवा भव्य प्रमोशन नसतानाही मिळालेला प्रतिसाद हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य असल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये विशेषतः बॉलीवूड, दाक्षिणात्य आणि मराठी सिनेसृष्टीत एक अत्यंत लक्षवेधी बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी चित्रपटगृहांमध्ये केवळ पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणारे रोमान्स, ॲक्शन किंवा मसाला पटांची जोरदार चलती असायची. अलीकडच्या काळात हा प्रवाह पूर्णपणे बदलला असून ‘आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक,सांस्कृतिक’ विषयांवर आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची जोरदार कमाई करत आहेत. हा केवळ एका विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांचा व्यावसायिक विजय नसून भारतीय जनमानसात पर्यायाने चित्रपटसृष्टीत सुरू असलेले ‘हिंदुत्वाचे पुनर्जागरण’ आहे.

काही काळापूर्वी असे मानले जायचे की, तरुण पिढीला केवळ आधुनिक किंवा पाश्चात्त्य विषयांमध्येच रस आहे. आध्यात्मिक चित्रपट हे आधुनिक तंत्रज्ञान, थक्क करणारे व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), उत्कृष्ट पार्श्वसंगीताच्या माध्यमातून सादर केले जात असल्यामुळे या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशाने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे.

प्रमुख चित्रपटांचे बजेट आणि त्यांच्या कमाईचे थक्क करणारे आकडे पुढीलप्रमाणे..

– ‘कल्की २८९८ एडी’: महाभारत व कल्की अवताराची पार्श्वभूमी असलेल्या या सायन्स-फिक्शन पौराणिक चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल १,१८० कोटींपेक्षा जास्त कमाई करून नवा इतिहास रचला.

– ‘कांतारा’: केवळ १६ कोटींच्या अत्यंत मर्यादित बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कर्नाटकातील सनातन लोकपरंपरा.. दैवी शक्तीचे सादरीकरण करत जगभरात ४०० ते ४५० कोटींचा गल्ला जमवला.

– ‘कार्तिकेय २’: भगवान श्रीकृष्णाच्या इतिहासाचा व  द्वारकेचा शोध घेणाऱ्या या चित्रपटाने केवळ १५ ते २० कोटींच्या बजेटमध्ये १२० कोटींहून अधिक व्यवसाय केला.

– ‘हनुमान’ : प्रशांत वर्मा दिग्दर्शित या सुपरहिरो चित्रपटामध्ये पौराणिक कथा व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम पाहायला मिळाला. ३० ते ४० कोटींच्या मर्यादित बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ३०० ते ३५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली..

– ‘महावतार नरसिंह’ या एनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. अवघ्या १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशात आणि परदेशात २२५ ते ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

– ‘राजा शिवाजी’: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत या ऐतिहासिक चित्रपटाने महाराष्ट्राच्या अस्मितेला व शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाला अत्यंत भव्य स्वरूपात मांडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल १३० कोटींहून अधिक जगभरात कमाई केली. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

– ‘देऊळ बंद २’ : प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाने स्वामी समर्थांवरील भक्ती व आधुनिक विज्ञानाचा ताणतणाव यांची सुरेख गुंफण घातली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटींची नेट कमाई करत मराठीतील आध्यात्मिक संकल्पनेची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

छद्मी डाव्यांची कारस्थाने..

हिंदी चित्रपटांनी इस्लामला शांतताप्रिय, कनवाळू धर्म म्हणून चित्रित करताना हिंदू विधी,परंपरा,आस्था तसेच धर्मग्रंथाची येथेच्छ खिल्ली उडवली. हिंदू कायमच अति सहिष्णू आणि कणाहीन होते, त्यांच्यात नैतिकता नव्हती हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न जाणूनबुजून होत राहिला. नीतिहीन आणि वाईट चारित्र्याचे खलनायक हे नेहमीच हिंदू दाखवले जात होते..

मार्क्सवादी आणि त्यांचे समर्थक असलेल्या धर्मांध,जिहादी इस्लामवाद्यांनी हिंदी चित्रपट उद्योगावर नियंत्रण मिळवल्यामुळे, हिंदूविरोधी कथा जाणूनबुजून रूढ करण्यात आल्या.भारतीय प्रेक्षकांमध्ये जसजसा प्रभाव आणि लोकप्रियता वाढत गेली, तसतसे या उद्योगाने मुघलांची क्रूरता लपवण्याचा आणि त्यांना भारतीय उपखंडाचे तारणहार.. कला.. सौंदर्यशास्त्राचे संरक्षक म्हणून चित्रित करण्याचा छद्मी प्रयत्न केला.

वास्तववादाच्या नावाखाली कम्युनिस्टांनी सुरू केलेल्या तथाकथित उदारमतवादी साहित्य कला चळवळीने भारतीय चित्रपटसृष्टीला अपरिमित हानी पोहोचवली.
काश्मीरच्या स्थलांतराचा आणि हिंदू नरसंहाराचा खरा इतिहास इस्लामी डाव्या विचारसरणीने जाणीवपूर्वक लपवून ठेवला होता. ‘काश्मीर फाईल्स’ने खोट्या वर्णनाच्या छदमीवृत्तीचा पर्दाफाश केला आहे.

वेद, उपनिषदे, पुराणे, आणि आपल्या स्थानिक लोककला यांमध्ये दडलेले ज्ञान, तत्वज्ञान आता चित्रपटगृहांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येत आहे. जेव्हा एखादी पौराणिक कथा किंवा शिवकालीन शौर्यगाथा हॉलिवूडच्या तोडीस तोड तंत्रज्ञानासह सादर केली जाते, तेव्हा ती पाहण्यासाठी प्रेक्षक स्वतःहून चित्रपटकडे आकर्षित होतात. ‘कमाई’चे हे गणित केवळ धार्मिक किंवा प्रादेशिक भावनेवर नसून त्यामागे गुणवत्तेचा,सादरीकरणाचा दर्जाही तितकाच महत्त्वाचा आहे.

चित्रपट निर्मिती हा शेवटी एक व्यवसाय आहे. निर्माते आणि वितरक नेहमी अशा विषयांच्या शोधात असतात जे सुरक्षित गुंतवणूक मानले जाऊ शकतात. आध्यात्मिक विषयांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या चित्रपटांना एक ‘तयार प्रेक्षकवर्ग’ मिळतो.

कांतारा दिग्दर्शक-सह-अभिनेता ऋषभ शेड्डी यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दल थोडक्यात भाष्य केले. जुन्या संस्कारांचे चित्रण करणारा असा व्हिडिओ का बनवला गेला, असे एका पत्रकाराने विचारले असता, ऋषभ शांतपणे म्हणाला, ‘माझ्या संस्कृती आणि परंपरेवर चित्रपट दुसरा कोणी येऊन बनवणार का ?’

– हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख