Monday, September 7, 2026

महाराष्ट्रातील गरबा फक्त हिंदूंपुरताच!

Share

महाराष्ट्रात होणाऱ्या गरबा उत्सवामध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. असा निर्णय का घेतला आहे आणि त्यामागची कारणमीमांसा काय आहे, याचा वेध घेणारा हा विशेष लेख…

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना विश्व हिंदू परिषदेने आयोजकांना दिल्या आहेत. प्रत्येक सहभागी होणाऱ्या तरुणाची ओळख तपासावी, त्याच्या आधार कार्डाची पडताळणी करावी आणि प्रत्येक सहभागी होणाऱ्या तरुणाच्या कपाळावर टिळा असावा, असेही परिषदेने म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि संयुक्त सचिव श्रीराज नायर यांनी गरबा हा केवळ नाच-गाण्याचा कार्यक्रम नसून देवीच्या उपासनेशी संबंधित धार्मिक उत्सव असल्याचे सांगितले आहे. यंदा नवरात्र ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

गरब्याच्या आधीचे धक्कादायक चॅट

विहिंपला ही भूमिका का घ्यावी लागली, याची पार्श्वभूमी तपासायला हवी. गेल्या वर्षी म्हणजे सन २०२५मध्ये विरारच्या विवा कॉलेजमधील गरबा कार्यक्रमातले प्रकरण पाहूया.

गरब्यासाठी कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींबाबत दोन अल्पवयीन मुलांनी सोशल मीडिया / व्हॉट्सअॅपवर संभाषण केले. त्यात ‘एकही हिंदू मुलगी सोडू नका..’ असा उल्लेख असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर या चॅटमधील पुढचा मजकूर अधिक धक्कादायक होता. मुलींशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत चर्चा, हिंदू मुलीशी जवळीक साधण्याचे उल्लेख आणि रात्री कॉलेजमधील कोणता मजला तुलनेने निर्मनुष्य असेल, याची चर्चा या संभाषणात असल्याचे एनडीटीव्ही मराठीने नमूद केले होते.

या संभाषणात अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा होती. पुढे काही मुलींचे व्हिडिओही मोबाईलमध्ये आढळले. प्रकार उघडकीस आल्यानंतर कॉलेज प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार केली. बोळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन अल्पवयीन आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे

मुंबई आणि मुंबई महानगर परिसरात गेल्या काही वर्षांत ओळख लपवणे, प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि धर्मांतराच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

मीरा रोडमधील सन २०२३च्या एका प्रकरणात आरोपीने आत्महत्येची धमकी देऊन तरुणीला जाळ्यात खेचले आणि लैंगिक अत्याचार केला. नंतर व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत मुस्लिम पद्धतीने लग्न व धर्मांतरासाठी दबाव आणला. सन २०२४मध्ये मीरा रोडमधील दुसऱ्या प्रकरणात एका हिंदू महिलेला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला. मग अडीच लाखांची खंडणी मागण्यात आली. यंदाच मिरा-भाईंदरमध्ये १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला सहा महिने कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिच्या नावाने बनावट खाते उघडून कथित ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आले. नंतर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला. उल्हासनगरमध्ये एकाने लग्नापूर्वी ‘विजय’ हे नाव घेऊन मैत्री केली आणि लग्नानंतर आपल्या म्हणजे मुस्लिम धर्मात येण्याचा दबाव टाकला. असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळेच, विश्व हिंदू परिषदेने आता हा निर्णय घेतला आहे.

कुराण, तफ्सीर, हदीस आणि गरबा

गरबा-दांडिया हा संगीत, ताल आणि नृत्याशी जोडलेला हिंदू धार्मिक उत्सव आहे. इस्लामी धार्मिक साहित्यात संगीत आणि वाद्यांविषयी निषेध आहे.

कुराणच्या सूरह लुकमान ३१:६च्या इब्न कसीर तफ्सीरमध्ये लह्व अल-हदीसचा संदर्भ देताना अब्दुल्लाह इब्न मसूद यांचे मत नोंदवले आहे… ‘By Allah, this refers to singing.’ त्याच तफ्सीरमध्ये गायन, बासरी (मझामिर) आणि वाद्यांशी संबंधित उल्लेख आहेत.

सहीह अल-बुखारी 5590मध्ये अल-मआझिफ (المعازف) हा शब्द येतो. त्याचा अर्थ musical instruments — संगीताची वाद्ये असा दिला आहे. या हदीसमध्ये अल-मआझिफचा उल्लेख निषिद्ध गोष्टींच्या संदर्भात करण्यात आला आहे.

पारंपरिक इस्लामी फिक्ह साहित्यातही संगीतवाद्ये आणि काही प्रकारच्या नृत्याबाबत निर्बंध आहेत. म्हणजे गायन, वाद्ये आणि नृत्य याबाबत निषेधाची परंपरा इस्लाममध्ये आहे.

मग मुस्लिम तरुण का येतात?

इस्लामी धार्मिक साहित्यात गायन, वादन आणि काही प्रकारच्या नृत्याबाबत स्पष्ट निषेध, निर्बंध असताना मुस्लिम तरुण गरबा-दांडियात का येतात? गरबा हा हिंदू धार्मिक उत्सव आहे आणि त्याची धार्मिक ओळख जपण्याचा अधिकार आयोजकांना आहे.

हिंदू महिलांची फसवणूक, अत्याचार व ब्लॅकमेल

याची सर्वांत वेदनादायक बाजू म्हणजे हिंदू महिलांची फसवणूक आणि त्यांच्यावरचे अत्याचार. खोटी ओळख सांगून संबंध निर्माण करणे, प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करणे, लैंगिक शोषण, अश्लील फोटो-व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, धमकावणे किंवा धर्मांतरदबाव असे प्रकार सर्रास चालू आहेत. यातील प्रत्येक प्रकारात महिलांच्या स्वातंत्र्यावर, प्रतिष्ठेवर आणि आत्मसन्मानावर घाला घातला जातो.

हे सगळे गंभीर महिलाविरोधी अत्याचार आहेत. अशा प्रकरणांकडे प्रेमप्रकरण म्हणून पाहणे, ही आत्मवंचना आहे. हा सर्व हिंदू महिलांच्या सुरक्षेचा, स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ कोणाला गरब्यात प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, इथवर हा प्रश्न मर्यादित राहत नाही. हिंदू महिलांची फसवणूक, अत्याचार आणि त्यांची विटंबना या साऱ्याकडे साऱ्या समाजाने डोळे उघडून पाहण्याची गरज आहे.

– राज भाटिया

….

स्रोत

लोकसत्ता : विहिंपची गरबा-दांडिया घोषणा
एनडीटीव्ही मराठी : विरारच्या विवा कॉलेजमधील प्रकरण
एबीपी माझा : मिरारोड गुन्हा, २०२३.
हिंदुस्थान टाइम्स : मिरारोड गुन्हा २०२४.
फ्री प्रेस जर्नल : मिरा-भाईंदर येथील १५ वर्षी मुलीवर अत्याचार
टाइम्स ऑफ इंडिया : उल्हासनगर प्रकरण
Quran.com : सूरह लुकमान 31:6, इब्न कसीर तफ्सीर
Sunnah.com : सहीह अल-बुखारी 5590

अन्य लेख

संबंधित लेख