Monday, September 14, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी – ‘सेवा संकल्प अभियान’

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवतील. असं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत सांगितलं.

 ‘जन-भागीदारी’च्या माध्यमातून ‘विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले.

आज अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या सेवा संकल्प अभियानाबद्दल माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थित होती. या अभियानांतर्गत 12 वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

या काळात  रक्तदान शिबीर, आभार प्रदर्शन, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी कामे पोहोचवण्याचे अभियान, असा बारा कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख