कर्नाटकच्या बागलकोटमध्ये, सरकारी नम्मा क्लिनिकच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता यरगल यांच्यावर नोकरीसोबत खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्णवेळ शिक्षण घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी सुमारे 6 महिने क्लिनिकमध्ये ड्युटी केली नाही, तरीही त्यांना दरमहा 70 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत राहिला. डॉ. अंकिता या बागलकोटचे काँग्रेस आमदार उमेश मेटी यांच्या पुतणी आहेत. त्यांचे वडील राजकुमार यरगल हे बागलकोटचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) आहेत. प्रकरण समोर आल्यानंतर वडिलांनीच डॉ. अंकिता यांना ड्युटीवरून काढण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातही राहुल गांधींच्या काँग्रेसने आणि तत्कालीन सत्ताधारी आघाडीच्या काळात सत्ता, शासकीय संसाधने, महामंडळे, सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांचा वापर स्वतःच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि निकटवर्तीयांना आर्थिक व संस्थात्मक लाभ पोहोचवण्यासाठी केल्याची अनेक गंभीर प्रकरणे समोर आलेली आहेत. सार्वजनिक करातून जमा झालेला पैसा कांग्रेसने स्वतःच्या घशात घातला. जर चौकशीत हे सिद्ध झाले की डॉ. अंकिता यांनी सरकारी नोकरी करत असताना नियमांविरुद्ध पोस्ट ग्रॅज्युएशन (PG) चे शिक्षण घेतले आणि त्या काळात सरकारी पगार घेतला, तर तो परत करावा लागेल.

प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेस आमदाराची पुतणी डॉ. अंकिता यांना वांबे कॉलनी येथील नम्मा क्लिनिकमधून कार्यमुक्त करण्यात आले.
काँग्रेस व आघाडी सरकारच्या काळात अनेक आमदारांनी स्वतःची मुले, मुली, पुतणे, मेहुणे किंवा घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कागदोपत्री ‘स्वीय सहाय्यक’ म्हणून दाखवून शासनाकडून दरमहा लाखो रुपयांचे मानधन उचलल्याचे अनेकदा प्रसारमाध्यमांत उघड झाले. अनेक कांग्रेसच्या लोकप्रतिनिधींच्या मुलांनी परदेशात किंवा मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण घेत असतानाही, ते मतदारसंघात आमदारांचे ‘पूर्णवेळ पीए’ म्हणून कार्यरत असल्याचे दाखवून दरमहा शासकीय वेतन लाटल्याचे प्रकार माहिती अधिकारातून (RTI) समोर आले होते.
काँग्रेसने सत्तेत असताना निसर्गाच्या पंचमहाभूतांपैकी एकाही घटकाला भ्रष्टाचारापासून दूर ठेवल नाही.
आकाश (तेज व वायू): ‘बोफोर्स’ तोफ गैरव्यवहार प्रकरणापासून ते ‘ऑगस्टा वेस्टलँड’ हेलिकॉप्टर घोटाळ्यापर्यंत किंवा ‘२जी स्पेक्ट्रम’च्या वाटपातील अनियमिततेपर्यंत अदृश्य लहरी आणि आकाशाशी संबंधित तंत्रज्ञानात मोठे गैरव्यवहार गाजले. ऐंशीच्या दशकात भारतीय सैन्याच्या बळकटीकरणासाठी स्वीडनच्या बोफोर्स कंपनीकडून तोफा खरेदी करण्याचा करार करण्यात आला होता. या करारात कोट्यवधी रुपयांची राजीव गांधी यांच्यावर लाचखोरी झाल्याचे आरोप समोर आले. या प्रकरणामुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि तत्कालीन सरकारला राजकीय पडझडीचा सामना करावा लागला. तसेच दूरसंचार क्षेत्राच्या क्रांतीमध्ये ‘स्पेक्ट्रम’ (अदृश्य लहरी) हे देशाची मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती मानले जातात. २जी स्पेक्ट्रमच्या वाटपात पहिल्यांदा येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाचा गैरवापर करून परवान्यांचे वाटप अत्यंत अल्प दरात करण्यात आल्याचा आरोप महालेखापरीक्षकांनी (CAG) केला होता. यामुळे सरकारी तिजोरीचे अतोनात नुकसान झाल्याचा दावा केला गेला आणि देशात तंत्रज्ञान-आधारित भ्रष्टाचाराची मोठी चर्चा सुरू झाली. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करार: व्हीव्हीआयपी प्रवासासाठी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील कथित दलालीचा मुद्दा पुढे आला. अवकाशातून उडणाऱ्या या साधनांच्या खरेदीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मध्यस्थांना लाच दिल्याचा आरोप झाल्याने संरक्षण करारांमधील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
जल (पाणी ): महाराष्ट्रात आणि देशात विविध मोठ्या सिंचन योजना, धरणे आणि जलाशयांच्या उभारणीत झालेल्या हजारो कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. जल हे मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पृथ्वी आणि अग्नी हे घटक जमिनीतील खनिज संपत्ती, कोळसा आणि ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासात या दोन्ही घटकांचा मोठा वाटा आहे. देशातील कोळसा खाण वाटप घोटाळा (Coal Scam) आणि ऊर्जा क्षेत्रातील खासगी कंपन्यांना दिलेले बेकायदेशीर अभय यांमुळे ऊर्जा क्षेत्र भ्रष्टाचाराचे कुरण बनले. तसेच रस्ते, हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंत्राटांमध्ये झालेल्या प्रचंड गैरव्यवहारा केला. जमिनीच्या पोटात दडलेली कोळशाची संपत्ती आणि त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा (अग्नी) या दोन्हीशी संबंधित असलेला हा मुद्दा अत्यंत गाजला. कोणत्याही पारदर्शक लिलाव प्रक्रियेशिवाय खासगी कंपन्यांना कोळसा खाणींचे वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच रस्ते, महामार्ग आणि औष्णिक वीज प्रकल्पांच्या कंत्राटांमध्ये घोटाळे झाल्याच्या आरोपांमुळे विकासाचा वेग मंदावला. खासगी कंपन्यांना दिलेले अभय आणि अटी व शर्तींचे उल्लंघन यांमुळे ऊर्जा क्षेत्रात मोठे आर्थिक घोटाळे झाल्याचा दावा पुराव्यासकट त्यावेळी विरोधकांनी केला होता.
राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने जेव्हा जेव्हा सध्याच्या भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेव्हा विरोधी पक्षांकडून नेहमीच काँग्रेसला त्यांच्या प्रदीर्घ काळातील या महाघोटाळ्यांची आठवण करून दिली जाते. दिल्लीच्या ‘जंतर-मंतर’वर किंवा रस्त्यांवर भ्रष्टाचाराविरोधात जी-जी आंदोलने झाली, ती मुख्यतः काँग्रेसच्या तत्कालीन सरकारांमधील गैरव्यवहारांविरोधातच पेटून उठली होती.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अधिपत्याखालील शिक्षण संस्थांमध्ये शासकीय अनुदान आणि नियुक्त्यांचे गैरव्यवहार गाजले. यातील प्रमुख टीईटी (TET) आणि शिक्षक भरती घोटाळा शिक्षण सम्राट व संस्थाचालक घराणी म्हणजे पतंगराव कदम (भारती विद्यापीठ समूह), डी. वाय. पाटील समूह आणि विखे-पाटील परिवार या घराण्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये ट्रस्टी व संचालक पदांवर कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती करून संस्थांवर एकाधिकारशाही चालवणे आणि शासकीय जमिनी सवलतीच्या दरात लाटल्याचे आरोप वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात आले.पायलट असलेल्या त्यांच्या मुलाच्या (नरेन्द्रमोहन) खात्यात २० ते २५ कोटी रुपयांचे ‘व्याजमुक्त/असुरक्षित कर्ज’ (Unsecured Loans) जमा दाखवले गेले.पुण्याचे काँग्रेसचे माजी खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी क्रीडा मंत्री सुनील केदार हे या बँकेचे अध्यक्ष असताना, त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून खाजगी होम ट्रेड कंपनी आणि अन्य एजंट्समार्फत बँकेचा १५० कोटी रुपयांचा निधी गुंतवला.
राहुल गांधी भाजपवर आरोप करताना प्रथम काँग्रेस मधला एवढ्या वर्ष जो देश लुटला तो भ्रष्टाचार मान्य करावा. जंतर मंतर वर अशी अनेक आंदोलन केली ज्या मध्ये काँग्रेस च्या भ्रष्ट व्यवस्थेने जनतेला नाडले. आज भाजप सरकार सामान्य माणसाला अधिकार देण्यासाठी प्रयत्नरत आहे. काँग्रेस आज भाजपच्या खोट्या कागाळ्या सांगून जनतेला आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करत जरी असली, तरीही स्वतः भ्रष्टाचाराची विषवल्ली ज्यांनी वाढवली त्यांची जुनी खोड अजूनही तशीच आहे.