स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवड राज्यात अव्वल; महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराने महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शहराला हा बहुमान प्रदान करण्यात आला. अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत गौरवोद्गार काढताना दिली आहे.
शहराच्या सुनियोजित विकासासाठी दूरदृष्टीने नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य देण्यात आले. यासोबतच स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, महापालिका प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे पिंपरी-चिंचवडला हे यश मिळाले.
शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच स्वच्छतेप्रती असलेली बांधिलकी या पुरस्कारातून अधोरेखित झाली आहे. या यशाबद्दल महापालिका प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.