काही लोकांना आई-वडिलांनी स्वतःचे ठेवलेल्या नावा विपरीत कसे वागायचे कसे बोलायचे यासाठीच जन्म घेतलेला असतो. असाच एक महाभाग म्हणजे ज्ञानेश नावाचा ज्याच्या आडनावात महाराव असे आहे तो होय.
याच्या आई-वडिलांनी ज्ञानेश नाव ठेवताना कदाचित हा संत ज्ञानेश्वरांप्रमाणे काहीतरी समाजाला ज्ञान देऊ शकेल या आशेने ठेवले असावे. परंतु म्हणतात ना नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा ! तसे या महाभागाचे नाव ज्ञानेश पण हाती अज्ञानाचा दिवा असे झाले आहे. आपल्या महाराष्ट्रात स्वतःला विचारवंत म्हणणारे अनेक जण आहेत. त्यांना विखारवंत किंवा विषारवंत का म्हणू नये ? असा अनेक वेळा प्रश्न पडतो या यादीतील एक अग्रेसर नाव म्हणजे हा ज्ञानेश महाराव.
या विचारजंताना सुपारी दिली आहे. सुपारी कसली तर ? RSS, भाजप याना शिव्या द्या. मग हळूच ब्राह्मण लोकांना लाथा मारा. आपोआप ध्रुवीकरण होईल. मग आपणच ओरडू हिंदुत्व म्हणजे भटशाही. एकदा हे केले की मुसलमान , ख्रिश्चन कुरवाळू आणि सत्तेचे मलिदे वाटून खाऊ. ह्या विखारवांतना साहित्य संस्कृती मंडळ , अनुदान , साहित्य अकादमी , साहित्य संमेलन अध्यक्ष पद असे मलिद्यातले खरकटे, उष्टे चालते. त्यावरच हे सुपारी बाज विखारवंत खुश ! सुपारी देणारे आपल्या परिवाराची , खानदानाची संपत्ती पुढील आठ पिढ्या पर्यंत नेण्यासाठी यांचा वापर करत आहेत. चालले आहे असेच वर्षां मागून वर्षे!
जातीय विद्वेषाच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील जाति विद्वेषाचे अग्रणी जाणते राजे आणि आपण कोणाचे वारसदार आहोत? हे विसरलेले दुसरे महाराज यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष प्रभूरामचंद्रा बद्दल जे उद्गार या अज्ञानेशाने काढले आहेत त्याचा जितका निषेध करू तितका थोडाच आहे. अर्थात अशाप्रकारे ह्या लोकांनी जाणीवपूर्वक वक्तव्य करण्यासाठी उचकवण्याचे काम जे जाणते राजे वारंवार करतात त्यांच्या मिठाला जागण्यासाठी हे सगळे विखारवंत अशा प्रकारचे वाक्ताडन करत असतात.
एकीकडे संत रामगिरी महाराज यांनी वक्तव्य केल्यावर त्याचे पडसाद सर्वत्र मुस्लिम समाजाकडून उमटले गेले किंबहुना अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना प्रोत्साहित करणारे हिंदूच होते हे दुर्दैव. व्होट जिहादचा फॉर्मुला यावेळेस अधिक यशस्वी करण्यासाठी हिंदूंच्या भावनांचा कुठलाही विचार न करता जी वाटचाल विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर देशात राजकीय पक्ष करत आहेत ती दुर्दैवी आहे.
प्रभू रामचंद्राबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य होत असताना वास्तविक व्यासपीठावरती बसणाऱ्यानी थांबवण्याची गरज असताना जाणीवपूर्वक त्याचं सर्वत्र प्रसारण करून हिंदू समाज हा किती भेदरट आहे आणि कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही हे अधोरेखित करण्याचं षडयंत्र एक प्रकारे आखले जात आहे. प्रभू रामचंद्रां बद्दल वाईट वाईट बोलणं हे निषेधार्ह आहे.
ज्या व्यासपीठावर हा प्रलाप चालू होता, त्या व्यासपीठावर मागे संभाजी ब्रिगेडचा बॅनर होता. संभाजी राजांनी धर्मासाठी आपले सर्वस्व बलिदान केलं .शरीराचे हाल करून घेतले . परंतु त्यांच्या नावाने ब्रिगेड चालवणाऱ्यांनी त्यांच्याच जीवन निष्ठेला सुरुंग लावण्याचे काम केले. संभाजी राजांच्या बलिदानाचा योग्य मतितार्थ समजावून न घेता खऱ्या अर्थाने धर्मवीर असणाऱ्या आमच्या राजाला योग्य अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर हिंदू धर्माला एकत्र आणणे हिंदू धर्माचा स्वाभिमान जागृत करणे हे आवश्यक आहे परंतु ही मंडळी वेगळेच उद्दिष्ट घेऊन त्यांच्या राजकीय धनीच्या मर्जीप्रमाणे वागत आहेत आणि मग अज्ञानेश असणाऱ्या महारावाला पण जणू काही आपण महाराज आहोत अशा भावनांनी बोलण्याची उर्मी येते आहे.
एकीकडे रामगिरी महाराजांबद्दल मत व्यक्त करताना आमचे त्यांच्याकडे लक्ष आहे .आमचे वकील त्याकडे लक्ष ठेवून आहे . असे उद्दाम पणे सांगायचे.त्यांच्यावरती केस करावी अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला अर्ज द्यायचे.खरे तर असे पक्ष आणि त्यांचे तथागतीत नेते हे हिंदू म्हणून घेण्यास लायकीचे नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागते .अर्थात त्यांनाही स्वतः हिंदू असल्याचे काहीही सोयरसुतक नाही.
अज्ञानेश महारावाला सगळीकडे निषेध करून त्याला गाव बंदी आणि सभाबंदी करण्याची गरज आहे. स्वतःच्या इतकेच स्वार्थासाठी हिंदू हिताचा बळी देत देशाला अराजकतेकडेकडे नेणारे ही मंडळी यांना काळ कधीही माफ करणार नाही.
प्रभू रामचंद्र हे आमच्या दृष्टीने आदर्श पुरुष आहेत, आदर्श राजा आहेत ,आदर्श कुटुंब प्रमुख आहेत ,आदर्श पुत्र आहेत, आदर्श पिता आहेत. आणि हो आदर्श पती पण आहेत .त्यांच्या जीवनातील कुठल्यातरी एका प्रसंगाचा भांडवल करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे हा जुना खेळ आहे. परंतु प्रभू रामचंद्रांचे संपूर्ण आयुष्य ज्या पद्धतीने व्यतीत झाले ते मुळातून संपूर्ण हिंदू समाजाला दिशादर्शन करून गेलेले आहे .त्यावेळीची सामाजिक परिस्थिती आणि त्या वेळेच्या राज्यकर्त्यांची कर्तव्य संकल्पना व्यासपीठावर बसलेल्या (अ) जाणते राजे आणि पूर्वज विस्मृत वारसदार याना असण्याची शक्यता नाही. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी जो निर्णय घेतला त्यानंतर त्याचे प्रायश्चित म्हणून ते कसे जगले? या बद्दल चकार शब्द न काढता त्याचा कुठलाही संदर्भ न घेता आजच्या काळात त्याची मोजपट्टी करून आमच्या आदर्शाना चुकीचं ठरवणे ही तथाकथिती पुरोगामी डाव्या मंडळींची जुनी खोड आहे.
या डाव्यांना पुरोगाम्यांना आणि हिंदुत्व द्वेष्ट्यांना अन्य धर्मीयांमधील कुठलेही विरोधाभास दिसत नाहीत. त्याबद्दल ते बोलत नाहीत. किंबहुना त्याचे उदात्तीकरण हिरीरीने ते करतात .पण हिंदूंच्या आदर्शांना लाथाडायचं मात्र सोडत नाहीत. कुठल्यातरी नाटकाचा संदर्भ घेऊन हा अज्ञानी बालक जे काही बोलला आहे ते निंदनीय आहे. वास्तविक त्या नाटकात काय उल्लेख आहे माहित नाही .परंतु अशाप्रकारे खरोखरच उल्लेख असेल तर नाटक, साहित्य, चित्रपट या माध्यमातून हिंदू देवदवतांची टिंगल निंदानालस्ती आणि आमच्या आदर्श पुरुषांचा अपमान आम्ही सहन केला म्हणून ही आज वेळ आलेली आहे .
हा अज्ञानी ज्ञानेश ज्या हिंदुत्वा बद्दल प्रवचन देत होता आणि व्यासपीठावरील त्याच्या प्रेषित असणाऱ्यांचे कौतुक करत होता त्याला माहित नाही त्याच्या सारखे आणि त्याच्या प्रेषिता सारखे नास्तिक पण हिंदू परंपरेने सामवून घेतले आहेत. पण नास्तिक पण प्रामाणिक असतात . अरे अज्ञानी माणसा तुझ्यासारखे , तूझ्या प्रेषितां सारखे संधीसाधू , लफंगे नसतात. ज्या स्वामी समर्थांच्या वर घाणेरडी टीका तू केली त्यांच्या , गजानन महाराज यांच्या प्रेरणेने किती सेवाकार्य आणि अन्नदान चालू आहे माहिती आहे का तुला ? स्वतःची घर भरायला प्रेरणा देणाऱ्या ह्या विभूती नाहीत . तू राजकारण्याच्या नादी लागून भाविकांचा जो घोर तळतळाट घेतला आहे त्याचे परिणाम आज ना उद्या तुम्हा सर्वांना भोगावे लागतील. हिंदू नरसिंह जागा होण्याचा अवकाश तुझ्यासारखे असंख्य हिरण्यकश्यपू मातीत मिळतील.
सर्व स्वामीभक्त , दिंडोरी प्रणित मोरे संप्रदाय , दत्त संप्रदाय या सर्वांचा या नालायक अज्ञानी ज्ञानेशने अपमान केला आहे. तो आणि त्याची प्रेरणास्थान याना योग्य तो धडा पुढील काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला माहिती आहे आमच्या परंपरेत ‘ सर तन से जुदा’ ही प्रक्रिया नाही किंवा आम्ही असा विचार पण करत नाही. परंतु कोणी उठावं आणि काही बोलावं आणि आम्ही शांतपणे ऐकून घ्यावं अशी स्थिती आता नसेल हे अशा बरळणाऱ्याने लक्षात ठेवावे.
काही महिन्यापूर्वी या जाणता राजांच्या उपस्थितीत भालचंद्र नेमाडे नामक एका म्हातारजळ लागलेल्या विखारवंताने औरंगजेबाची भालावण आणि काशी विश्वेश्वराचा खोटा इतिहास सांगितला होता. हे केवळ योगायोग नसतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एकीकडे मुसलमानांचा गौरवीकरण ख्रिश्चनांचा उदात्तीकरण आणि दुसरीकडे हिंदूंचे प्रताडन असा योजनाबध्द जर एखाद्याचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्याला त्याच राजकीय भाषेत उत्तर देण्याची वेळ आता आलेली आहे .
एकीकडे वारकरी लोकांमध्ये जाऊन मानभवी पणे धर्मांध शक्ती वारीत शिरल्याचे बोलायचे , लालबाग येथे जाऊन गणपती दर्शन करायचे आणि दुसरीकडे देवाचे आम्ही बाप आहोत म्हणायचे , देवाची टिंगल टवाळी होत असताना गालातल्या गालात हसून प्रतिसाद द्यायचे ! हा दुहेरीपणा लोक आता समजून घेतील अशी आशा आहे .
कोल्हापूरची गादी राजाराम महाराज यांची. त्या गादीकडे आम्ही नितांत आदराने पाहतो. अशावेळी राजाराम म्हणजे कोण ? प्रभू रामचंद्र यांच्या नावातून हे आले ना ? छत्रपतींनी असणार प्रभू रामचंद्र यांच्याबद्दलच्या अभिमानाने हे नाव आले असेल ना ? महाराज , काही दिवसापूर्वी राहुल गांधींच्या मागे शाल घेवून आम्ही तुम्हाला सत्कार करण्यासाठी फिरताना पाहिले! का अशी अवस्था करून घेता त्या जाणत्या राजाच्या सल्ल्यावरून ? अजूनही वेळ गेली नाही निषेध करा त्या अज्ञानी महारावचा! तुमच्या गादी कडून हिंदूंची ही अपेक्षा आहे.
दुर्दैवाने आम्ही राजकारणामध्ये असणाऱ्या अशा लोकांना जी भाषा समजते ती भाषा हिंदू म्हणून वापरत नाही ती भाषा म्हणजेच मतांची भाषा आम्हाला समजत नाही. आम्ही मतदान करताना हिंदू म्हणून मतदान करत नाही तर आमच्यातला व्यक्तिगत नोकरदार शेतकरी कामगार पुरुष महिला युवा आणि मग विविध जाती यामध्ये विभागला गेलेला हिंदू मतदान करतो आणि त्याचाच फायदा या प्रकारचे राजकीय लोक घेतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आश्रयाखाली वाढलेले अज्ञानेश सारखे अनेक महामूर्ख बोलत राहतात.
इथून पुढे महाराष्ट्रात कुठेही सार्वजनिक सभेत या माणसाला बोलू द्यायचे नाही .असा निषेध केल्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाहीत .असे आम्ही म्हटल्यावर अभिव्यक्तीचा कळवळा सगळ्यांना येईल पण तो अभिव्यक्तीचा कळवळा फक्त आम्हालाच लागू का ? रामगिरी महाराजांवर जेव्हा अशा प्रकारे निषेध कार्यक्रम सुरू होतात तेव्हा या सगळ्या मंडळींची अभिव्यक्तीची कौतुके कुठे गेलेले असतात? तेव्हा त्यांची तोंडे शिवलेले असतात .दातखिळी बसलेली असते. फक्त आणि फक्त जेव्हा हिंदू समाज काही प्रतिक्रिया द्यायला लागतो तेव्हा मात्र यांची अभिव्यक्ती जागी होते अशा दुतोंडी लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे .
अशा प्रकारच्या असंख्य घटना घडत आहेत , घडल्या आहेत पण हिंदू समाज हा या निमित्ताने जागा होणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. त्याला गुंगीचे औषध देण्याचे काम ब्रिटिशांनी सुरू केले काँग्रेसने त्यात आणखी भर घातली. डावे आणि प्रादेशिक पक्ष यांनी हा अजेंडा पुढे नेला. त्याचा परिणाम मात्र भीषण आहे. डोळे असून समाज आंधळा , कान असून कर्ण बधीर आणि मेंदू असून सारासार विवेक शून्यता ही आमची आज अवस्था झाली आहे. आता कुणी कृष्ण तुमचा आमचा संभ्रम दूर करायला येणार नाही आता आम्हीच कृष्ण , आम्हीच अर्जुन झालो तरच दुर्योधन , दुःशासन ओळखू येतील. तरच महाभारत घडेल . तरच इंद्रप्रस्थ सज्जन, धर्माभिमानी आणि राष्ट्राभिमानी लोकांच्या ताब्यात राहील.
रवींद्र मुळे.
अहिल्या नगर.