Saturday, July 27, 2024

‘यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार’

Share

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर (Solapur), सातारा (Satara) आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा घेतल्या. सातारा येथे महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. ‘कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या सातारकरांना माझा नमस्कार’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली.

‘सातारा हे प्रत्येक देशभक्तांसाठी, भारत भक्तासाठी एखाद्या तीर्थस्थळपेक्षा कमी नाही. या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. माझे सहकारी मला सांगत होते कि, मोदीजी तुम्ही एवढ्या लांब यायची गरज नाही. या भूमीत यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार आहे’, असल्याचे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख