Tuesday, June 9, 2026

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

Share

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारा

पालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि परदेशात नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे हिंदू मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आहे. स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली कितीतरी मुली परदेशात नेण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. एका मुलीने पाण्यात गुंगीचे औषध मिसळुन लव्ह जिहादमध्ये फसवले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असली तरी समोर आलेले चित्र अत्यंत चिंताजनक आहे.

भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हिंदुत्ववादी विचारसरणी नेहमीच समाजातील माता-भगिनींच्या सन्मानाचे आणि सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे अशा घटना घडल्यावर केवळ गुन्हेगारांना शिक्षा देणे पुरेसे नाही, तर समाजात व्यापक जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन मैत्री, परदेशी शिक्षणाची आमिषे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर याबाबत तरुणींना जागरूक करणे काळाची गरज बनली आहे. आज अनेक तरुण-तरुणी डिजिटल माध्यमांतून संपर्कात येतात. अशा वेळी पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. हिंदू समाजाने आपल्या मुलींना शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षण, सायबर सुरक्षा आणि कायदेशीर हक्क यांची माहिती देण्यावर भर दिला पाहिजे.

बोर्डी-डहाणू प्रकरणातील सत्य तपासातून समोर येईल. मात्र या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की समाज म्हणून अधिक सजग, संघटित आणि जागरूक होण्याची गरज आहे. कोणताही गुन्हेगार, कोणत्याही धर्माचा किंवा पार्श्वभूमीचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पीडितांना संपूर्ण न्याय मिळाला पाहिजे. हिंदुत्वाची भूमिका हीच आहे की समाजातील माता-भगिनींचा सन्मान आणि सुरक्षा सर्वोच्च राहिली पाहिजे.

“स्त्रीचा सन्मान हीच संस्कृतीची ओळख; तिच्या सुरक्षेसाठी समाजाचे संघटन हीच काळाची गरज. जैन आणि मारवाडी समाजातील २२-२३ वर्षांच्या मुलींना कुणी सलीम, फारुख यांसारखे लोक प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्टुडंट व्हिसावर थेट लंडनला घेऊन गेल्याच्या घटनांचे प्रमाण पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.”
– आमदार चित्रा वाघ

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख