Tuesday, January 14, 2025

कासिम पठाणचा छळ अखेर ठरला जीवघेणा; 16 वर्षीय पूजाची आत्महत्या

Share

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडलेल्या एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटनेत, गॅरेज वर काम करणाऱ्या आरोपी कासीम यासिन पठाण (वय २१) नावाच्या स्थानिक मुस्लिम तरुणाने अनेक महिन्यांपासून केलेल्या सततच्या छळानंतर 16 वर्षीय मराठा मुलीने स्वत:च्या विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव घेतला. पूजा शिवराज पवार (वय १६) असे या मृत मुलीचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी 1 च्या सुमारास प्रकार घडला. घटनेनंतर, स्थानिक पोलिसांनी कासिम पठाण विरुद्ध छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पुजाने दहावीत 96 टक्के मिळवले होते, पूजा सध्या अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. ती शहरातच खाजगी क्लास करत तेथेच राहत होती. रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे आली होती. मागील सात-आठ महिन्यांपासून आरोपी कासिम पठाण हा तिला बळजबरीने ‘प्रेम कर’ असे म्हणून त्रास देत होता. ही बाब पुजाने तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी आरोपी कासिम पठाण याला चार ते पाच वेळेस समजही दिली होती.

अन्य लेख

संबंधित लेख