राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संस्कृतिक आघाडीचे वारकरी संमेलन पुण्यात दि २५ऑगस्ट रोजी संपन्न झालेल आहे. शरद पवार यांनी संमेलनात नेहमी प्रमाणे समाजात संभ्रम आणि गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य केले आहेत. शरद पवार महाराष्ट्रातील मोठ व मुत्सद्दी राजकारणी नेतृत्व आहे. संपूर्ण देशात त्यांचा नावलौकिक सुद्धा आहे तसेच त्यांची राजकीय फायदासाठी सतत मुखवटे बदलणारी प्रतिमा सुध्दा आहे.
राज ठाकरे यांनी काही वर्षा पूर्वी शरद पवार यांच्यावर जातीयवाद वाढविण्याच्या आरोप करून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या जन्मा नंतरच महाराष्ट्रात जातीयवाद उदयास आला आहे असा आरोप केला होता. त्याचा प्रत्यय पुण्यातील वारकरी संमेलन मध्ये आला आहे. शरद पवार यांनी नेहमी प्रमाणे हिंदू समाजात दुफळी आणि संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केलेले आहे. वारकरी संमेलनात शरद पवार म्हणाले वारकरी संप्रदाय मध्ये धर्मांध लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत, ही कटुता संपविण्याची असेल तर अध्यात्मिक व वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रीय व्हावे लागेल असे म्हटले आहे.
शरद पवार यांचे वक्तव्य सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी बंधूचे अपमान करणारे आहे कारण वारकरी संप्रदायात कोणी धर्मांध नाही किंवा कोणत्याही वारकऱ्यांनी “सर तन से जुदा” घोषणा दिल्या नाहीत किंवा कधीच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणारी कट्टरतेची शिकवण कधीच दिलेली नाही. “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद अमंगळ” हा सहिष्णू आणि उदात्त विचार घेऊन वारकरी संप्रदायाची वाटचाल सुरू आहे. सतत वर्धिष्णू ठरत आहे वारकरी संप्रदायाचा पाया मुळातच अध्यात्माचा असून रामायण महाभारत जीवनमूल्ये आहेत तसेच “राम कृष्ण हरी” हा तीन अक्षरी मंत्र पंचप्राण आणी आत्मा आहे. या तीन अक्षरी मंत्राला वारकरी संप्रदाया मध्ये फार मोठे महत्व आहे कोणताही वारकरी एकमेकांना भेटल्यास किंवा प्रेमाचं आलिंगन देतांना राम कृष्ण हरी मंत्राचे उच्चारण करून अभिवादन करतो, परंतु शरद पवार यांचा राजकीय प्रवास लक्षात घेतल्यास त्यांना “राम कृष्ण” नामस्मरणच वावडे दिसत. राम कृष्ण त्यांनी आवडत नाहीत त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा विचार केल्यास त्यांनी देशाला रामायण महाभारताची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
तसेच सत्तेत असतांना त्यांनी वारकरी बंधू साठी वारी मार्गावर कोणत्याच सुविधा उपलब्ध केल्या नाहीत, मात्र ज्या कोंढव्यात देशविरोधी कारवाया निष्पन्न झाल्या इसिस सारख्या संघटना सोबत संबंध ठेवणाऱ्या शांतीदूतावर कारवाई झाली त्या कोंढव्यात मुस्लिम समाज साठी हज हाऊस उभारले गेले नाही अशी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया असलेलं रामायण महाभारत ची आवश्यकता वाटत नाही, वारकरी संप्रदाया साठी योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यांनी राम कृष्ण हरी मंत्राचा गजर करणाऱ्या वारकरी बंधूंना वारकरी संप्रदायात धर्मांधता वाढली असल्याचे सल्ले देणे कितपत योग्य आहे? त्यांचे राजकीय क्षेत्रात योगदान मोठे असेल पण वारकरी क्षेत्रात योगदान काय आहे? वास्तविक पाहता धर्मांध कोण आहे व कटुता कोणी वाढविली आहे हे सर्वश्रुत आहे. तसेच वारकरी संप्रदायाच्या समरस वारी मध्ये ढोंगी धर्मनिरपेक्ष मंडळी आणि बाडगे सर्वधर्मसमभाववादी मंडळींना घुसण्याच्या षडयंत्राचे प्रयोग करून वारीला कोणी नासविण्याचा करीत आहेत हे सुध्दा सर्वश्रुत आहेच.
शरद पवार यांनी पुण्या सारख्या ठिकाणी “सर तन से जुदा” घोषणा दिल्या जातात, लव्ह जिहाद सारखे प्रयोग तथा मदरश्या मधुन धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिलं जाते अशा धर्मांधेतेवर भाष्य कारणे अपेक्षित आहे. परंतू मतांच्या राजकारणा साठी तेथे डोळेझाक करण्यात येते आणि वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्याची बतावणी केली जाते त्यामुळे शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात धर्मांधता वाढल्याचे वक्तव्य दुटप्पी आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे तथा निर्थक आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. शरद पवार यांनी वारकरी संप्रदाय संमेलनात लावलेली हजेरी आणि केलेल्या वक्तव्याचा विचार केल्यास असे लक्षात येते की त्यांनी आता पर्यंत फुले शाहू आंबेडकर यांच्या नावांची जपमाळ करीत महाराष्ट्रात राजकारण केले आहे. तसेच पुरोगामी विचारांच्या गोंडस नावा खाली अनेक हिंदूत्व विरोधी संस्था संघटनांना पाठबळ दिलेल आहे. आता त्यांना फुले शाहू आंबेडकर सोबत वारकरी संप्रदायाला एकत्र करून राजकीय मोट बांधायची असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. नजिकच्या काळात शरद पवारांच्या राजकीय गणितांना ओहोटी लागली असल्याचे दिसत असल्याने त्यांनी वारकरी संप्रदायात नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःला पुरोगामी म्हणणारे शरद पवार एकी कडे रामायण महाभारताची आवश्यकता नसल्याचे म्हणतात नाही परंतु, तिहेरी तलाक कुराणचां आदेश त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही तसेच त्यांच्या पक्षाची नेते धर्मांध औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्म घरात व नमाज रस्त्यावर चालेल अशी दुटप्पी भूमिका घेतात मुंबई मधील अल्पसंख्याक बैठकीत स्वतः शरद पवार यांनी अल्पसंख्याक अर्थात मुस्लिमांच्या हिता साठी आपण सर्व काही करू अशी भूमिका घेऊन पराकोटीचा मुस्लिम अनुनय जोपासला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या संमेलन घेतलेली भूमिका किंवा केलेल वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून आगामी काळातील विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तथा मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने केलं आहे असा निष्कर्ष काढण्यास काहीच हरकत नाही.
तसेच शरद पवार नेहमी समाज घटकांच्या विविध क्षेत्रात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करून गोंधळ निर्माण करीत असतात. पुण्याच्या वारकरी संप्रदायाच्या संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्यांनी तेच करून वारकरी संप्रदायात उभी फूट पडन्यासाठी खेळी खेळली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अशोक राणे
अकोला
Share
अन्य लेख