Friday, September 11, 2026

भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू  

Share

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी साकोली तालुक्याच्या पिंपळगावजवळ भोकर झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांना पंतप्रधान सहाय्यता कक्षाकडून दोन लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. पिंपळगाव येथील एका पेट्रोल पंपावरून एक आयशर ट्रक रस्त्यावर निघत असताना, मागून येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्स गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

8 मजुरांचा जागीच अंत, जखमींवर उपचार सुरू

या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्समधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख