मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांचा वेग अतिशय वाढता ठेवला आहे. त्यात भर म्हणून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी १०-११ जुलै रोजी विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल, मानखुर्द – महाराष्ट्र नगर उड्डाणपूल आणि दिंडोशी-फिल्मसिटी उड्डाणपूल या दोन दशकाहून अधिक काळ रखडलेल्या तीन प्रमुख उड्डाणपुलांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या मुंबईत सर्वच ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते आणि ही समस्या जणू मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेली आहे.
१९९१ च्या मुंबई विकास आराखड्यात (Development Plan 1991) मंजूर झालेली अनेक प्रलंबित विकास काम आता मुख्यमंत्री पूर्णत्वास घेऊन जात आहेत. तब्बल 35 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना या वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळेल. या प्रलंबित कामात या वर्षी म्हणजे २०२६ च्या ऑगस्टमध्ये विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल व डिसेंबर मध्ये दिंडोशी-फिल्मसिटी उड्डाणपूल ही दोन्ही काम पूर्ण होतील. तसेच मानखुर्द – महाराष्ट्र नगर उड्डाणपूलाच काम हे दोन आर्मच मध्ये विभागलेल काम आहे. त्यामुळे हे काम २०२७ पर्यंत पूर्ण होईल याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
सद्य स्थितीत मुंबईमध्ये रस्त्यावर वाढत जाणाऱ्या गाड्या व जागतिक उद्योगाच्या वाढत्या धबडग्या मुळे ट्रॅफिक जॅम ची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR) सध्या १४० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असून, ती २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलरच्या (सुमारे १२५ लाख कोटी रुपये) अर्थव्यवस्थेकडे वेगाने कूच करत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि नवीन व्यावसायिक केंद्रांच्या निर्मितीमुळे हे शक्य होत आहे. महाराष्ट्र राज्य २०२७ पर्यंत भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या ध्येयात तब्बल १.५ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देण्याच्या मार्गावर आहे。मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्थाही २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा निर्धार नीती आयोगाने केला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राच्या जनतेचा वाढलेला कमालीचा वेग हा या वाहतुकीच्या प्रश्नामुळे वाया जातो आणि मुंबईकरांची प्रचंड दमछाक होते.
३५ वर्ष रखडलेले तीन उड्डाणपूल :
विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल (Vidyavihar Connector) हा लवकरच म्हणजे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यन्त सुरु होईल. रेल्वे रुळांच्या वरून जाणारा मुंबईतील सर्वात लांब (१०० मीटरचा) ‘ओपन-वेब गर्डर’ यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे त्यामुळे जवळ पास ८०% ते ९०% पूर्ण झालय. ह्या पूलाच वैशिष्ट्य असा की हा पूल विद्याविहार पूर्व आणि विद्याविहार पश्चिमेला जोडेल. सध्या कुर्ला किंवा घाटकोपर मार्गे वळसा घालून जावा लागत त्या ऐवजी हा प्रवास थेट होईल. एलबीएस मार्ग (LBS Marg) आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन प्रमुख मार्गांमधील प्रवासाचा वेळ किमान २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. हे काम शेवटच्या टप्प्यात असल्याने, जेव्हा पूल सुरू होईल तेव्हा पूर्व आणि पश्चिम बाजूच्या पोहोच रस्त्यांवर (Approach Roads) गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करावं लागेल. त्याचेही निर्देश यानिमित्ताने अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. यासाठी ‘एन’ विभागाचे (N-Ward) अधिकारी आणि वाहतूक पोलीस हे मिळून रस्त्यातील अडथळे, पदपथ आणि झाडांच योग्य नियोजन करतील जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही.
दुसऱ्या पुलाच काम याच वर्षी २०२६ डिसेंबर पर्यंत दिंडोशी-फिल्मसिटी उड्डाणपूल (Dindoshi-Film City Flyover) पूर्ण होईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा (SGNP) गेट पासून थेट दिंडोशी सेशन कोर्ट पर्यंत हा उड्डाणपूल असेल. झाडांचे नुकसान, जंगल-क्षेत्र या विभागांच्या द्वारे पर्यावरणाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन परवानग्या मिळाल्यानंतर आणि बाधित रहिवाशांचे पुनर्वसन केल्यानंतर आता पुलाच्या पिलर्सचे आणि गर्डरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून (WEH) फिल्मसिटी आणि आयआयटी बॉम्बे (पवई) कडे जाणाऱ्या वाहनांना दिंडोशी कोर्ट जंक्शनवरील प्रचंड ट्रॅफिकमधून मुक्ती मिळेल. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला (GMLR) पूरक म्हणून हा पूल काम करेल आणि पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल.
तिसऱ्या बाजूला मानखुर्द – महाराष्ट्र नगर उड्डाणपूल (T-Junction) यामधल्या दोन्ही आर्मचे काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. या टी-जंक्शनवर सकाळी आणि रात्री स्थानिक रहिवाशांसह मुंबई-वाशी आणि वाशी-मुंबई तसेच घाटकोपर-मानखुर्द मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून पालिकेने दोन स्वतंत्र मार्गिका (Arms) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे:
- आर्म – १: घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावरून थेट वाशीच्या दिशेने जाणारी मार्गिका.
- आर्म – २: सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपुलावरून घाटकोपरच्या दिशेने जाणारी मार्गिका.
सध्या महावितरण आणि टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या (Transmission Lines) स्थलांतराचे काम सुरू आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश आहेत.
मुंबई विकास आराखडा (Development Plan 1991):
१९९१ चा मुंबई विकास आराखडा (Development Plan 1991) हा मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांचा आणि भौगोलिक विस्ताराचा पाया होता. मुंबई महापालिकेने (BMC) शहराच्या नियोजनासाठी तयार केलेला हा दुसरा २० वर्षांचा मास्टर प्लॅन (Master Plan) होता. पहिला आराखडा १९६४ मध्ये आला होता. त्यानंतर आलेल्या या १९९१ च्या आराखड्याने मुंबईची ‘बंदर आणि गिरणगाव’ ही ओळखी जाऊन एक ‘ग्लोबल बिझनेस हब’ ही झाली असती, परंतु राजकारणाच्या कचाट्यात सापडलेला हा आराखडा प्रशासनाचे कागदी घोडे नाचविण्यात अगदी हरवून गेला.
१९९१ च्या मुंबई विकास आराखड्यात (Development Plan 1991) संकल्पना, प्राथमिक आखणी, नियोजन आणि मसुदा तयार करण्याचे काम मुख्यत्वे शरद पवार मुख्यमंत्री असताना (१९८८ ते जून १९९१ दरम्यान) झाले. हा आराखडा मंजूर होण्याची आणि तो अधिकृतरीत्या लागू होण्याची प्रक्रिया म्हणजेच मंजुरी आणि अंमलबजावणी जून १९९१ नंतर म्हणजेच सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पार पडली.
साधारण २००९-२०१४ च्या काळात जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते आणि मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती, तेव्हा या प्रकल्पाची प्राथमिक आखणी झाली. काँग्रेसने नेहमीच बाता मारण्यात वेळ घालवला की, मुंबईच्या विकासासाठी आणि पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी या प्रकल्पाची मूळ संकल्पना आणि नियोजन त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले.
मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ नियंत्रण असलेल्या शिवसेनेने (अविभाजित) या प्रकल्पाचा आराखडा प्रत्यक्षात आणणे, मंजुऱ्या मिळवणे आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्या पलीकडे काही केले नाही. पर्यावरण मंजुरी मिळवण्यात झालेल्या विलंबावरून आणि प्रकल्पाच्या श्रेयवादावरून कांग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले.