Tuesday, February 10, 2026

“णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Share

नाशिक : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत होणारा पंचकल्याणक महोत्सव धार्मिक अनुष्ठान नाही, तर देशाच्या प्राचीन, आध्यात्मिक, परंपरा, शांती, करुणा आणि साधनेच्या उत्सवाचे प्रतीक आहे. तीर्थकारांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन बांधवासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

जग आज पर्यावरणाच्या समस्येशी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत जैन समाज प्राणीमात्रांवर दया करण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. समाजाचा विकास हा देशाच्या विकासाशी जोडला असल्याचा संदेशही जैन समाज देतो. याबरोबरच हा समाज सेवा कार्यातही पुढे आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन मदत करीत असून परिसरात पायाभूत सोयीसुविधा आदी कामे झाली आहेत. उर्वरित कामासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख