Monday, April 20, 2026

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”

Share

बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड

ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे फसवाया?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या युसुफ शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर चुकीच्या नमुन्याचा (नमुना-८) वापर करून जात दाखला मिळवला. हा दाखला मिळवताना शासकीय नियमांची पायमल्ली झाली, असे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, स्थलांतरितांसाठी अनिवार्य असलेला नमुना-१० टाळण्यात आला, ही बाब अधिक गंभीर ठरते. याच संशयास्पद दाखल्याच्या आधारावर सहर शेख यांनी मुंबई शहरातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणूक लढवून विजयही मिळवला.

ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) आरक्षण हे समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. मात्र सहर शेख व युसुफ शेख यासारखे लोक खोटे कागदपत्र तयार करून किंवा चुकीची माहिती देऊन बोगस ओबीसी दाखले मिळवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकारांमुळे खऱ्या हक्कदारांवर अन्याय होत असून समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जितेंद्र आव्हाड सारख्या विकृत नेत्याने पाळलेले हिरवे साप आता ओबीसी आरक्षणाचा आणि भारतीय संविधानचा गळा घोटत आहेत.

हा बोगस ओबीसी दाखला काढण्यापर्यत नाही, तर तो लोकशाहीवरील थेट आघात आहे. हम अल्लाह के मोहताज है और किसके बाप के मोहताज नही है| हे विजयानंतरच्या सभेतील सहर शेखचे वाक्य आहे. तीने खरे करुन दाखवलेले आहेत. आपल्या विजयाचे श्रेय भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकराना न देता अल्लाहला दिले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान अपमान आहे. सहर शेख आणि युसुफ शेख तेच वारंवार करत आहेत. शेवटी, “कैसे हराया?” या गर्वाचा खरा अर्थ आता समोर येत आहे. जर हा विजय नियमांना वाकवून मिळवला असेल, तर तो विजय नसून लोकशाहीची फसवणूक आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर अशा प्रकरणांवर कठोर आणि पारदर्शक कारवाई गरजेचे आहे.

अन्य लेख

संबंधित लेख