इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव बदलून मोहम्मद अली ठेवल्याची जाहीर घोषणा केल्यानंतर काही आठवड्यांनी… शामलीस्थित औषध व्यावसायिक देवराज मलिक यांचा एकुलता एक मुलगा आयुष मलिक (३०) हा घरवापसी करून पुन्हा हिंदू धर्मात परतला आहे… त्याच्या कुटुंबीयांनी तो घरी पूजा करत असल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे…
व्हिडिओमध्ये, आयुष आपल्या आईला उद्देशून तयार केलेले निवेदन वाचताना दिसत आहे… “आई, मी इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि माझा धर्म बदलला होता. तुझे आणि आपल्या कुटुंबाचे दुःख पाहिल्यानंतर, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने माझ्या धर्मात परत आलो आहे… मला तुझ्या आणि माझ्या वडिलांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या छायेत जगायचे आहे. कृपया मला माफ कर,” असे तो म्हणतो… फुटेजमध्ये तो कुटुंबाच्या मंदिरात पूजा आणि आरतीमध्ये सहभागी होताना देखील दिसत आहे… देवराज मलिक यांनी व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा दिला आहे…
“एक वडील म्हणून, मी देवाचा मनापासून आभारी आहे की माझा मुलगा, आयुष मलिक, याने त्याच्या सनातन मूल्यांशी आणि वैदिक परंपरांशी पुन्हा जोडले जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे देवराज म्हणाले… “आमच्यासाठी सनातन हा केवळ एक धर्म नाही, तर संस्कृती, मूल्ये आणि अध्यात्म यांमध्ये रुजलेली एक शाश्वत जीवनशैली आहे.”…
८ जून २०२६ रोजी आयुषचे ईदची नमाज अदा करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर… त्याच्या इस्लाम धर्मांतरामुळे आणि चांदनी कुरेशीसोबतच्या लग्नामुळे शामलीमध्ये वाद निर्माण झाला होता…
या घटनेने हिंदू संघटनांचे लक्ष वेधले गेले आणि उत्तर प्रदेश धर्मांतर प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…
आयुषचे वडील देवराज मलिक यांनी असा आरोप केला होता की… त्यांच्या करोडोंच्या कौटुंबिक मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी एका मोठ्या कटाचा भाग म्हणून आयुषचे “ब्रेन वॉश” करून जबरन धर्मांतर करण्यात आले… या तक्रारीवरून उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्म परिवर्तन प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर पोलिसांनी या प्रकरणी चांदनी आणि तिच्या वडिलांना अटक केली होती… याप्रकरणी ८ नामनिर्देशित आरोपींविरुद्ध FIR दाखल करण्यात आला होता…
मात्र त्यावेळी आयुषने आपण स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सांगितले होते… लहानपणापासूनच त्याचा इस्लामकडे कल होता, सुमारे ४ वर्षांपूर्वी त्याने धर्मांतर करून आपले नाव ‘मोहम्मद अली’ असे धारण केले आणि स्वतःच्या मर्जीने जिम ट्रेनर असलेल्या चांदनीशी लग्न केले… तसेच दोघेही सज्ञान असून त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे… असेही त्याने म्हटले होते…
मात्र आपला DNA सनातन संस्कृतीचा असून तो सहजासहजी बदलता येत नाही हेच आयुष मलिकने सिद्ध करून दाखवले आहे.