Tuesday, August 18, 2026

गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी

Share

गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी


गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्यासमवेत ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स नॅशनल कन्व्हेन्शन 2026’ च्या उदघाटन सत्रात ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ (IACC) च्या माजी राष्ट्रीय व प्रादेशिक अध्यक्षांचा सत्कार केला.

इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मुंबईत हॉटेल ललित येथे राष्ट्रीय परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले. यावेळी नॉर्थ इंडिया कौन्सिलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ललित भसीन, ईस्ट इंडिया कौन्सिलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रणजीत सेन, वेस्ट इंडिया कौन्सिलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया, साऊथ इंडिया कौन्सिलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पूर्णचंद्र राव सुरपनेनी आदी मान्यवर उपस्थित होते.

गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्र शासन त्यांना येथील बाजारपेठ, पायाभूत सुविधा, कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अन्य लेख

संबंधित लेख