Wednesday, August 19, 2026

महाराष्ट्र जगाच्या नकाशावर ओळखला जातो तो मुंबई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे – अमेरिकन राजदूत सर्गिओ गोर यांचे गौरवोद्गार

Share

महाराष्ट्र जगाच्या नकाशावर ओळखला जातो तो मुंबई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे – अमेरिकम राजदूत सर्गिओ गोर यांचे गौरवोद्गार

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना “अद्भुत आणि दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री” असे संबोधले आहे. मुंबईतील इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना गोर यांनी महाराष्ट्राच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक महत्त्वावर भाष्य केले.

https://twitter.com/zee24taasnews/status/2089942649709134266/video/1

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना “अद्भुत आणि दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री” असे संबोधले आहे. मुंबईतील इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना गोर यांनी महाराष्ट्राच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक महत्त्वावर भाष्य केले.

https://www.facebook.com/reel/1000136139714920

महाराष्ट्राच्या जागतिक ओळखीचा उल्लेख करताना गोर यांनी मुंबई ही एक महत्त्वाची जागतिक नगरी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्राला जागतिक पटलावर विशेष स्थान मिळवून देण्यात राज्याच्या नेतृत्वाचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमेरिकन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे केंद्र

अमेरिका महाराष्ट्रात आधीपासूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसह उपस्थित असून, भविष्यातही दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या नव्या संधी शोधल्या जातील, असे सर्जियो गोर यांनी सांगितले. तंत्रज्ञान, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि राजदूत गोर यांच्यात महाराष्ट्रातील अमेरिकन व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधींबाबत चर्चा झाली. भारत-अमेरिका आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही या संवादात भर देण्यात आला.

महाराष्ट्राच्या विकासाला आंतरराष्ट्रीय पाठबळाची अपेक्षा

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, मोठी बाजारपेठ आणि विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधी यामुळे राज्याला भारत-अमेरिका आर्थिक सहकार्याच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकते. या भेटीमुळे महाराष्ट्रातील अमेरिकन गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याला भविष्यात आणखी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“महाराष्ट्राच्या विकासदृष्टीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; भारत-अमेरिका सहकार्याच्या नव्या संधींचे संकेत” अशी या भेटीची व्यापक चर्चा होत आहे.


अन्य लेख

संबंधित लेख