Saturday, September 5, 2026

UCI Road World Championships साठी महाराष्ट्राचे सहकार्य करण्याचे आश्वासन

Share

युनियन सायकलिंग इंटरनॅशनल (UCI) च्या शिष्टमंडळाने (Delegation) पुण्यात भेट दिली असून त्यांच्या सन्मानार्थ विशेष गाला डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान, शिष्टमंडळाने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ (Bajaj Pune Grand Tour 2026) च्या तयारीचे, प्रशासकीय समन्वयाचे आणि पुणेकरांच्या उत्साहाचे कौतुक केले.

पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग आणि क्रीडा पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

काल शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी पुण्यात आयोजित UCI (Union Cycliste Internationale)च्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ गाला डिनरला उपस्थित राहून त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. असे पवार यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/Dc4HxuiDHIK/?img_index=5

यावेळी UCI आणि Cycling Federation of India (CFI)च्या प्रतिनिधींसह पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्राच्या क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pune Grand Tourच्या यशस्वी आयोजनासह पुण्याच्या UCI Road World Championshipsच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र शासनाचे पूर्ण सहकार्य आणि ठाम पाठबळ राहील, अशी ग्वाही यावेळी दिली.

पुण्यातील उत्तम तयारी, प्रशासनाचा समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल UCI शिष्टमंडळाने व्यक्त केलेले समाधान निश्चितच आनंददायी आहे. पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग आणि क्रीडा पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.

अन्य लेख

संबंधित लेख