Wednesday, September 9, 2026

झुकू झुकू आगीनगाडी वाफेच्या रेषा हवेत काढी…

Share

एक मुंगळ्यांची वस्ती होती…

त्यात एक कुटुंब राहत होते… आई, बाबा आणि त्यांचा मुलगा… भाई…

शेजारी त्या कुटुंबाचे थोरले चुलत बंधू आपल्या परिवारासह राहत होते… आई बाबा त्यांचे दोन मुलगे… दादा आणि व्हीव्ही…

दादा थोरला असला तरी तो आणि भाई तसे समवयस्क…

दोन्ही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होती…

हळूहळू दोन्ही घरातले मुलगे वयात यायला लागले…

आणि एक दिवस मुंगळ्यांच्या जगरहाटीप्रमाणे ते समवयस्क चुलत भाऊ… दादा आणि भाई जोडीने अन्नपाण्याच्या शोधार्थ पहिल्यांदाच घराबाहेर पडले…

अर्धा दिवस गेला… घरी सगळे त्यांची वाट बघत होते…

थोरला चुलत भाऊ दादा मुंगळा गुळाचा एक दाणा घेऊन एकटाच परत आला…

तेव्हा भाई मुंगळ्याचे आई-वडील घाबरले… आणि पुतण्याला… आमचा मुलगा कुठे आहे?… म्हणून विचारू लागले…

तेव्हा पुतण्या दादा मुंगळा काका काकीला म्हणाला…

आम्ही दोघे फिरत असताना आम्हाला एक गुळाची ढेप मिळाली… आधी आम्ही दोघे पोटभर गुळ जेवलो…

मग मी हा दाणा घेऊन निघालो… भाईला पण चल म्हटलं…

पण भाई म्हणाला… तू दाणा घेऊन पुढे हो… मी ही गुळाची अख्खी ढेप पाठीवर घेऊन येतो… म्हणजे मग आयुष्यभर अन्नासाठी उगाच वणवण नको फिरायला…

तेव्हा काका दादाला थोडासा धक्का देऊन आल्या पावली परत पाठवतो… आणि म्हणतो…

धाव लवकर आणि भाऊला सांग… पोटभर गुळ खा व जेवढा जमेल तेवढाच घेऊन ये… उगाच ढेप आणण्याच्या भानगडीत पडू नकोस… आयुष्यभर बसल्या जागी पोट भरण्याच्या नादात कंबरडं तोडून घेशील आणि आम्हाला व्याप करून ठेवशील…

दादा आपण आणलेला गुळाचा दाणा घरी नेऊन ठेवतो आणि भ भाईला आणायला सावकाशपणे निघतो…

अन्य लेख

संबंधित लेख