Wednesday, September 9, 2026

भारताच्या फिनटेक यशोगाथेचा युपीआय हा निर्विवाद विजेता- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

भारताच्या फिनटेक यशोगाथेचा युपीआय हा निर्विवाद विजेता आहे. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन करताना काल बोलत होते.

यूपीआय आता ११ देशांमध्ये सुरू झाले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी एकेकाळी अकल्पनीय असलेली गोष्ट आता दैनंदिन वास्तव बनली आहे. भारताच्या प्रमुख डिजिटल पेमेंट प्रणालीच्या जागतिक विस्तारावर प्रकाश टाकत पंतप्रधानानी अधोरेखित केले.  

भारताच्या फिनटेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा या यशोगाथेचा निर्विवाद विजेता आहे. हे इतके मोठे परिवर्तन आहे की जेव्हा कधी फिनटेकवर चर्चा होईल, तेव्हा ती युपीआयशिवाय अपूर्ण राहील. तांत्रिक सक्षमीकरण हा आपल्या विकासाचा पाया असल्याचे ते म्हणाले.  युपीआयची आर्थिक समावेशनासाठीचे महत्त्वाचे साधन आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. दिर्घकाळापासून दुर्लक्षित असलेल्या  पारंपरिक बँकिंग मॉडेल्स क्षेत्रांमध्येदेखील युपीआयचा वापर यशस्वीरित्या पोहोचला आहे. केवळ ऑगस्ट महिन्यातच २४ अब्जाहून अधिक युपीआय व्यवहार झाले. ही बाब पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिली.

 युपीआय ही केवळ एक तांत्रिक कहाणी नाही; ही एक सांस्कृतिक कहाणी आहे. असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंटच्या पुढील धोरणात्मक टप्प्याची रूपरेषा मांडताना,  मोदींनी भागीदार देशांच्या देशांतर्गत पेमेंट प्रणालींसोबत यूपीआयचे एकत्रीकरण करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला, जे सिंगापूरसोबत आधीच स्थापित झालेल्या अखंड सीमापार कनेक्टिव्हिटीच्या (seamless cross-border connectivity) धर्तीवर असेल. या भागात भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर राहतात किंवा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो, तिथे सर्व संबंधित घटकांनी आर्थिक नेटवर्क सक्रियपणे जोडावे, असे निर्देश त्यांनी दिले. परदेशस्थ भारतीयांसाठी असलेल्या आर्थिक फायद्यांवर जोर देत पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणले की, जगातील सर्वाधिक आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी व्यवहाराचा खर्च कमी करणे या सुविधेला प्राधान्य आहे. जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंट प्रणालींचे एकत्रीकरण केल्यास परदेशातील भारतीयांना आपल्या देशात असलेल्या कुटुंबांना निधी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देता येईल.

अन्य लेख

संबंधित लेख