Thursday, November 21, 2024

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…?

Share

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा मतदारसंघाचे, जनसामान्यांचे उमेदवार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी आपण भाजपाच्या बाजूने निवडणूक लढवणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.


राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली असून अनेक जागांवरला तिढा सोडवण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे.

भडगाव पाचोरा मतदारसंघात धडाडीने काम करणारे, शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले जनसामान्यांचे उमेदवार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी आपण भाजपाच्या बाजूने निवडणूक लढवणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असून सुज्ञ मतदारांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. कोणतीही राजकीय खेळी किंवा कुणातरी सांगितले म्हणून किंवा मॅनेज केले म्हणून मी निवडणूक लढवत नसून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण काम करत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.   

अन्य लेख

संबंधित लेख