Monday, July 6, 2026

अमरनाथ यात्रा : स्वबोधातून राष्ट्रबोधाकडे – श्रद्धा, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश

Share

हिमालयाच्या पवित्र कुशीत वसलेली अमरनाथ यात्रा ही केवळ बर्फानी बाबांच्या दर्शनाची यात्रा नाही; ती भारतीय संस्कृतीच्या आत्म्याशी संवाद साधण्याची संधी आहे. कठीण पर्वतीय मार्ग, प्रतिकूल हवामान, हजारो स्वयंसेवकांची सेवा आणि विविध प्रांतांतून आलेल्या भाविकांचा संगम पाहिला की भारताची सांस्कृतिक एकात्मता प्रत्यक्ष अनुभवता येते. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रेकरूंना पाठविलेल्या संदेशात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी, सुरक्षा नियमांचे पालन आणि “राष्ट्र प्रथम” या भावनेने यात्रा करण्याचे आवाहन केले आहे़. हे आवाहन भारतीय संस्कृतीतील कर्तव्यप्रधान जीवनदृष्टीचे आधुनिक रूप आहे.


हे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेल्या ‘पंच परिवर्तन’ या व्यापक संकल्पनेशी सुसंगत आहेत. त्यातील स्वबोध, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन आणि स्वदेशी-आधारित अर्थव्यवस्था हे चार विचार अमरनाथ यात्रेच्या अनुभवातून जिवंत होतात. स्वबोध म्हणजे स्वतःची, आपल्या संस्कृतीची आणि राष्ट्राशी असलेल्या नात्याची जाणीव असणे. अमरनाथ यात्रेतील प्रत्येक पाऊल मनुष्याला संयम, त्याग, शिस्त आणि सेवाभाव शिकवते. यात्रेचा खरा उद्देश केवळ गुहेपर्यंत पोहोचणे नसून स्वतःच्या अंतर्मनातील स्वार्थ, अहंकार आणि उदासीनते वर विजय मिळविणे हा आहे. अशा आत्मपरिवर्तनातून राष्ट्रबोध निर्माण होतो. पर्यावरण संवर्धन हा भारतीय संस्कृतीचा सहजस्वभाव आहे. हिमालय हा केवळ पर्वत नसून भारताच्या जीवनवाहिन्यांचा उगम आहे.त्यामुळे यात्रेकरूंनी प्लास्टिकमुक्त यात्रा, स्वच्छता, जलस्रोतांचे संरक्षण आणि निसर्गाचा आदर यांचा संकल्प करणे हीच खरी शिवभक्ती आहे. पंतप्रधानांनी आपल्या पत्रात याच पर्यावरण-जागृतीचा आग्रह धरला आहे.कुटुंब प्रबोधन ही भारतीय समाजव्यवस्थेची ताकद आहे. यात्रा मुलांना श्रद्धा, शिस्त, सेवा, सहकार्य आणि वडील धाऱ्यांचा आदर यांचे संस्कार देते. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे तीर्थयात्रा केल्यास भारतीय संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे सहजपणे पोहोचतो. सुदृढ कुटुंब हीच सुदृढ राष्ट्राची पाया आहे.


अर्थव्यवस्थेला बळ देणे हा यात्रेचा महत्त्वाचा सामाजिक पैलू आहे. घोडेवाले, पालखीवाहक, वाहनचालक, भोजनव्यवस्था, निवास, हस्तकला आणि लघुउद्योग यांद्वारे निर्माण होणारा रोजगार हिंदू व्यक्तीला मिळाला पाहिजे. यात्रेकरूंनी हिंदूकडुन सेवा आणि उत्पादने स्वीकारल्यास श्रद्धा आणि सुरक्षितता दोन्ही गोष्टी मिळतील. हाच पैसा दहशतवाद्या ना मदत जिहाद्याच्या हातात गेला. तर याच पैशातुन हिंदू विरुध्द वापरला जातो. याची काळजी भाविकांनी घेतली पाहिजे. आत्मनिर्भर हिंदू आणि आत्मनिर्भर भारताचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी हा प्रभावी मार्ग ठरू शकतो. पण त्यासाठी हिंदू समाजाने व्यक्तीकडुन खरेदी आग्रह धरला पाहिजे. जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून खरेदी म्हणजे अप्रत्यक्षरीत्या जिहादी प्रवृत्तीला आणि दहशतवाद्यांना मदत करण्यासारखच आहे. त्यासाठी व्यक्तीला स्वबोध, कुटुंबातील संस्कार, पर्यावरणा विषयी संवेदनशीलता आणि हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाची भावना या सर्वांची जाणीव असणे आवश्यक आहे. श्रद्धा, सेवा, स्वबोध, पर्यावरण, संस्कारित कुटुंब आणि स्थानिक हिंदूचा विकास यांचा संगम साधणारा प्रत्येक यात्रेकरू हा केवळ भाविक राहणार नाही, तर तो सुरक्षित राष्ट्राचा वाहक बनेल.तो भारताच्या हिंदू परंपरेचा आणि आधुनिक राष्ट्रनिर्मिती चा हाच खरा सेतू आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख