Tuesday, December 3, 2024

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

Share

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंड
बोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केला
पण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल तर घेतली नाहीच पण उलट त्यांनाच
लक्ष्य केले. त्यामुळे राज्यभर अराजकसदृश्य स्थिति पसरली. त्याची काही ठळक उदाहरणे
पुढीलप्रमाणे:-
निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन
वाजेला पुन्हा सेवेत घेतले. उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या
आशीर्वादाने आधीच बदनाम असलेल्या या अधिकाऱ्याने खंडणी वसुलीचे सत्र सुरू केले.
दुसरीकडे, त्यामुळे प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची झाले. या अधिकाऱ्याने
एवढी वसुली सुरू केली की वसुलीचे पैसे मोजण्यासाठी त्याला कौंटिंग मशीन वापरून
यंत्रणा उभारावी लागली.
उद्धव ठाकरेंच्या काळात सचिव वाजे एवढा उन्मत्त झाला की त्याने थेट मुकेश अंबानींच्या
अँटेलियाबाहेर बॉम्ब ठेवला. वर हे उघडकीला आले तेव्हा मनसुख हिरेनची हत्या केली.  हे
उघडकीला आल्यावर देखील उद्धव ठाकरेंनी निर्लज्जपणे “वाझे काय लादेन आहे काय” असे
विचारले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यांचीच री ओढली.
पालघरमध्ये पोलिसांच्या सक्रिय साथीने साधुंना ठेचून मारले गेले तेव्हाही हा चौपट राजा
गप्प बसला होता.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशी झालेल्या याकूब मेमनची सुशोभित मजार उभी राहिली.
औरगजेबाच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहण्याचे प्रकार पण सुरू झाले. कोव्हीडमुळे
मेलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पीएफआयला बोलावले गेले.
सीबीआयला दिलेली सार्वत्रिक मान्यता रद्द केली. इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामात
देखील अडथळे आणले गेले. बिहारसारख्या इतर राज्यातून गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी
आलेल्या पोलिस अधिकार्‍यांचा छळ करण्यात आला.
परिणामी, औरंगाबाद, बीड, नांदेड, विदर्भात अमरावती, मालेगाव, पुणे, ठाणे, रत्नागिरी यासह
अनेक जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अड्डे उभे राहिले.
या सर्व अशुभ आक्रिताला विरोध करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, पत्रकार अर्णब
गोस्वामी, अभिनेत्री केतकी चितळे यांच्यासारख्या लोकांना धिंड काढून तुरुंगात डांबले.
अनंत करमुसेसारख्या कार्यकर्त्यांना पोलिसांद्वारे जितेंद्र आव्हाडसारख्या मंत्र्याच्या
बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली गेली. अभिनेत्री कंगना राणावत सारख्यांची घरे
पाडली जात होती. निवृत्त नौदल अधिकाऱ्यांवर हल्ले झाले. अकेला देवेंद्र क्या करेगा अशा
दर्पोक्ती केल्या गेल्या.
आता महाराष्ट्राला पुन्हा असेच काळे दिवस पहावे लागू नये यासाठी आपण मतदारांनी
सजग बनून महायुतीला विजयी करणे ही आज काळाची गरज आहे. हे करण्यात आपण
हयगय केली तर राज्यात पुन्हा अनागोंदी माजेल आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी
लागेल.

अन्य लेख

संबंधित लेख