Tuesday, September 17, 2024

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे

Share

हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याने वारीवरील इस्लामिक अतिक्रमण या विषयावर तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे यांचे सांगलीवाडी येथील दर्शन मंगल कार्यालयात 4 सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना ह.भ.प शिरीष महाराज मोरे म्हणाले की, मुस्लिम समाज हा पैगंबराला मानतो, विठ्ठलाला मानत नाही. पण आमच्या वारीमध्ये येऊन अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात तरीही हे हिंदू शांतपणे सहन करतात. आता तरी हिंदू जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर ज्या पद्धतीने अतिक्रमण केलं त्याच पद्धतीने पंढरीच्या वारीवर सुद्धा इस्लामिक अतिक्रमण झालेलं आहे. याला हिंदूने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे.

यावेळी बोलताना शिंदे आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, भारतामध्ये लव जिहाद, धर्मांतरण, गड जिहाद, लँड जिहाद, वारीवरील इस्लामिक अतिक्रमण करून हिंदूंची स्फूर्ती स्थळं, धार्मिक स्थळं नष्ट करून देशाच्या पोटात मिनी पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न हिंदूंनी एकत्र येऊन उधळून लावला पाहिजे.

या सभेचे स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब मोहिते यांनी केले. यावेळी मनोहर सारडा, लक्ष्मण नवलाई यांची भाषणे झाली. आभार हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी मानले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमाने, श्रीकांत शिंदे, शिवाजी पाटील, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अजय वाले, पंडितराव बोराडे, सुरेश पवार, सागर पाटील, ह भ प दिलीप सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण, दत्ता आंबी, परशुराम चोरगे, मनोज साळुंखे, शैलेश पवार, अभिमन्यू भोसले आदींसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अन्य लेख

संबंधित लेख