देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी एक अत्यंत खास प्रकल्प जो भारताच्या विकासाला हातभार लावेल. प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या या महाराष्ट्राच्या भूमिकेवर पुन्हा शिक्कामोर्तब करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पालघरमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मुंबईत जागतिक अर्थतांत्रिक महोत्सवात पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. त्यानंतर दुपारी पालघर इथं पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ होईल तसंच अन्य विकास प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ आणि उद्घाटनही होणार आहे.
वाढवण इथं देशातलं सर्वात मोठं आणि समुद्रात अधिक खोलवर असलेलं बंदर बांधण्यात येत आहे. या बंदरात अतीविशाल मालवाहतूक जहाजं उभारणं शक्य होईल आणि त्यामुळे देशाच्या सागरी व्यापाराला आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. पंतप्रधानांच्या हस्ते 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचंही उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. यातून पाच लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे.