संयुक्त राष्ट्रसंघाची ८१ वी आमसभा (81st UNGA) न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली असून…
जागतिक नेत्यांची मुख्य उच्चस्तरीय ‘सार्वत्रिक चर्चा’ २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडत आहे…
या आमसभेत भाषण करण्यासाठी इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू न्यूयॉर्कला पोहोचण्यापूर्वी…
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी बेंजामिन नेत्यानाहू यांना ‘युद्ध गुन्हेगार’ (War Criminal) संबोधले आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) त्यांच्याविरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी फेडरल सरकारने करावी आणि त्यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करावी, अशी मागणी केली…
आपल्या अधिकारकक्षे (खरंतर औकाती) बाहेरच्या घडामोडींवरअनावश्यक मतप्रदर्शन करण्याची जोहरान ममदानी यांना भयंकर हौस आहे… सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या न्यूयॉर्क येथील मेडिसन स्क्वेअर कार्यक्रमाला देखील त्यांनी असाच अपशकुन करण्याचा प्रयत्न केला होता…
त्यावेळीही ते जसे तोंडघशी पडले होते तसेच यावेळी देखील तोंडघशी पडले व बेंजामिन नेत्यानाहू यांनी रुबाबात संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत प्रवेश केला…

संयुक्त राष्ट्र संघात (UN) एकूण १९३ सदस्य देश आहेत… बेंजामिन नेत्यानाहू बोलायला उभे राहिले तेव्हा जवळपास ७७ देशांच्या प्रतिनिधींनी सभात्याग केला… यात बहुतांशी मुस्लिम तर स्पेन, आयर्लंड सारख्या काही युरोपियन व ब्राझील, चिली, कोलंबिया, पनामा, पेरू अशा काही लॅटिन अमेरिकन देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होता…

बहुतांशी सगळ्या मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींनी सभात्याग (walkout) केला तरीही ४ मुस्लिम राष्ट्रांचे प्रतिनिधी मात्र सभागृहात बसून राहिले… ते देश होते… बहरीन… अझरबैजान… कझाकस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) ची महिला प्रतिनिधी…
एका अर्थी इस्त्राएलने जिहादी मानसिकतेच्या हमास विरुद्ध चालवलेल्या लष्करी कारवाईला या ४ही मुस्लिम राष्ट्रांनी आपली संमती दर्शवली…

मात्र इजराइलच्या एका राजनयिक अधिकाऱ्याने सभागृहात फिरून बहिष्कार टाकलेल्या देशांची नोंद केली…
कायम दहशतवाद पोसणाऱ्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी सभात्याग केला तर इस्त्राएलचा पारंपारिक मित्र असलेल्या भारताचे प्रतिनिधी सभागृहात आवर्जून उपस्थित होते…
इस्त्राएलच्या नजरेतून या दोन्ही गोष्टी सुटलेल्या नाहीत…
जगात अनेक देशांमध्ये कायमच होरपळ झालेल्या यहुद्यांच्या (ज्यूंच्या) इस्त्राएलने इतिहासाकडून योग्य तो शत्रुबोध आणि मित्रबोध घेतला आहे एवढे निश्चित…

अत्यंत करारी आवाजातील आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच बेंजामिन नेत्यानाहू यांनी… “जर अजून कोणी नैतिकदृष्ट्या भ्याड (moral cowards) या सभागृहात उपस्थित असतील तर कृपया त्यांनीही बाहेर जावे” असे सांगून सभा त्याग करणाऱ्या देशांच्या अब्रूचे अक्षरशः खोबरे केले…
पुढे बेंजामिन नेत्यानाहू यांनी रोखठोकपणे जोहरान ममदानी यांचे… “तुम्ही मला येथे येण्यापासून रोखण्याचा आणि माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला आणि सत्याला गप्प करू शकत नाही. तुम्ही इस्रायलवर केलेले नरसंहाराचे आरोप खोटे आहेत; इस्रायलने नरसंहार केला नाही, तर तो रोखला आहे. तुमच्या इस्रायलवरील टीकेमुळे न्यूयॉर्कमधील ज्यू नागरिक धोक्यात आले आहेत, तुम्ही महापौर झाल्यापासून न्यूयॉर्कमध्ये राहणारे अनेक ज्यू स्वतःला सुरक्षित समजत नाहीत”… अशा शेलक्या या शब्दात पुरते वाभाडे काढले…

भाषण करताना त्यांनी हातात पेजर उंचावून धरला आणि “तुम्हाला हे बीपर्स आठवतात का? मला माहीत आहे की हिज्बुल्लाहला हे नक्कीच आठवत असतील,” असे म्हणून हमास ते हिज्बुल्लाह सारख्या जिहादी आतंकवादी संघटनांना आणि त्यांना सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या इराणसारख्या देशांना सज्जड दम भरला…
बेंजामिन नेत्यानाहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत दाखवलेला पेजर (बीपर) हा प्रत्यक्षात…
इतिहासापासून शत्रूबोध आणि मित्रबोध घेऊन… जगातल्या जवळपास २ कोटी यहुदी (ज्यू) बांधवांनी… एकाच वेळी सरस्वती आणि लक्ष्मीच्या आराधनेवर उभ्या केलेल्या “इस्त्राएल” नावाच्या एका सुसंघटित आणि बलशाली राष्ट्राच्या सामर्थ्याचा तो अलौकिक हुंकार होता…
आपल्या #NeverAgain या ध्येयाशी असलेली ती कटिबद्धता होती…

बेंजामिन नेत्यानाहू यांचे संपूर्ण भाषण अत्यंत आक्रमक आणि आव्हानात्मक होते…
त्यांनी इराणवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्ला चढवला… इराणच्या अण्वस्त्रांच्या तळांवर हल्ले करण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी सर्वात सोपा निर्णय होता, कारण तसे केले नसते तर आज आपण जिवंत नसतो, असा दावाही केला…
गाझा आणि वेस्ट बँक संदर्भातील भूमिकागाझामधील नरसंहाराचे (Genocide) आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावत हे आरोप म्हणजे “शतकातील सर्वात मोठे खोटे” असल्याचे म्हटले…
सभात्याग करणाऱ्यांना ‘नैतिकदृष्ट्या भित्रे’ (Moral Cowards) आणि ढोंगी म्हणत “इस्त्रायल स्वतःचे रक्षण करताना अशा अनेक देशांचे रक्षण करत आहे ज्यांचे प्रतिनिधी हॉल सोडून गेले,” अशा शब्दांत या देशांच्या अब्रूची लक्तरे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेशीवर टांगली…
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी, तुर्की आणि कतर या देशांवरही इस्रायलविरोधी खोटा प्रचार केल्याचा सणसणीत आरोप केला.
आम्ही हे युद्ध जिंकणारच कारण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असा दृढ निश्चय त्यांनी बोलून दाखवला…
एकंदरीत इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा संयुक्त राष्ट्रसंघातील रुद्रावतार पाहता… येत्या काळात इस्त्राएल मध्य पूर्वेतील जिहादी मानसिकतेच्या हमास आणि हिज्बुल्लाह सारख्या आतंकवादी संघटनांचा पुरता बिमोड करणार एव्हढे मात्र निश्चित…