Wednesday, March 4, 2026

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन

Share

नवी मुंबई (खारघर) : भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली आणि गुरु साहिबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

यावेळी ‘हिंद दी चादर’ राज्यस्तरीय समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आणि शीख समुदायातील विविध धार्मिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

तरुणाईसाठी प्रेरणादायी उपक्रम
खारघरच्या ओवे मैदानावर उभारण्यात आलेल्या या सोहळ्यात गुरुजींच्या जीवनकार्यावर आधारित विविध दालने आणि ऑडिओ-व्हिज्युअल कक्षांची मांडणी करण्यात आली आहे. या सोहळ्याला नवी मुंबई, मुंबई आणि राज्यभरातून हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, ओवे मैदान गुरुवाणी आणि कीर्तनाने दुमदुमून गेले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख