Thursday, April 2, 2026

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती

Share

वेळेच्या बचती सह प्रवास होणार सुखकर, १.८ कोटी प्रवाश्यांना सेवा देण्याचे उद्दिष्ट

मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीला गती देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि मोठ मोठे उड्डाण पुल याचा मोठा उपयोग करण्यात आला. यामुळे वाहतुक कोंडीतुन मुंबईकराची छोडीफार सुटका झाली. पण या वाहतूक कोंडीतून वेळ वाचू शकेल असा पर्याय सरकारनी काढला आहे. मुंबईला असलेला विशाल समुद्र कुशल वापर महाराष्ट्र सरकार मुंबईकराचा विकासाला गती देण्यासाठी वॉटर मेट्रो सुरू करणार आहे.

महाराष्ट्र सरकारने रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मुंबई मेट्रो विकसित केली. त्याचा फायदा मुंबईकरांना होतोच आहेच. मुंबईकराच्या प्रवासला आणखी एक पर्याय वॉटर मेट्रोच्या रुपाने सरकार देणार आहे. या नव्या योजनेत मुंबई आणि आसपासाच्या महानगरांना जोडण्यासाठी ३४० कि.मी. लांबीचे ३६ जलमार्गाचे निर्माण करणार आहे. हे जाळे वसई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे सारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांना वांद्रे, वरळी, नरिमन पॉईंट आणि गेट ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या भागांना  जोडेल. हे वॉटर मेट्रोचे जाळे एरोली, वाशी आणि नवी मुंबई अशा नव्याने विकसित होत असलेल्या शहरांना जोडेल.

बेस्टस बसेस, नवी मुंबई महानगरपालिका बससेवा, ठाणे महानगरपालिका बससेवा आणि मुंबई मेट्रो याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जल मेट्रोचे टर्मिनल्स इतर प्रवासी सेवाच्या थांब्याजवळ बांधण्यात येणार आहेत. पुर्वीच्या जलवाहतुकीतील त्रुटींवर काम करून अत्याधुनिक टर्मिनल्स बांधण्यात येणार आहेत.

मुंबई वॉटर मेट्रोमुळे वाहतुक कोंडी फोडण्यासाठी उत्तम पर्याय तयार होणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाच्या प्रवासाच्या तुलनेत निम्माच वेळ लागेल. त्यामुळे प्रवास हा नियोजित वेळेत आणि तणाव मुक्त होईल. गेट ऑफ इंडिया एलिफंटा बेट आणि मांडवा सारख्या पर्यटन स्थळांना जोडणारे जलमार्ग तयार केले जाणार आहेत.

डिझेल बोटी ऐवजी इलेक्ट्रिक बोटीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रवास शांत आणि प्रदूषण मुक्त  होणार आहे. प्रती प्रवासी 75% कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे विस्ताराची गरज कमी होईल. त्यामुळे खारफुटी आणि किनारी परिसंस्थाचे रक्षण होईल. वॉटर मेट्रो मुंबईची जीवन वाहिनी बनेल.

अन्य लेख

संबंधित लेख