Monday, October 19, 2026

टायगरवरील हल्ल्याचे सुत्रधार महाराष्ट्राबाहेरून किंवा परदेशातून सूत्रे हलवत आहेत – मुख्यमंत्री

Share

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयितांची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/2112039027448951124/video/1

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयितांची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. ही एक गंभीर आणि निषेधार्ह घटना आहे. मुंबई पोलिसांना याबाबतचे धागेदोरे हाती लागले असून संशय असेल्यांचां सुगावा लागला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे. संशयितांची ओळख पटली असून त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल. आम्ही त्यांच्या सूत्रधारांचाही शोध घेऊ, जे अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत आणि तिथून सूचना देत आहेत. यातील कोणीही व्यक्ती महाराष्ट्रातून कारवाया करत नाहीये. जे लोक राज्याच्या आतून कारवाया करत होते, त्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. हे लोक महाराष्ट्राबाहेरून किंवा परदेशातून सूत्रे हलवत आहेत. ज्या राज्यांतून ते कारवाया करत आहेत, तिथल्या प्रशासनाशी आम्ही समन्वय साधू आणि परदेशातून कारवाया करणाऱ्यांना पकडण्यासाठी केंद्राची मदत घेऊ. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी पुन्हा सांगतो की, हे भित्रे लोक आहेत जे लपून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले जातील.”

अन्य लेख

संबंधित लेख