केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे व माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘Build in Bharat, Design in Bharat’ (भारतात निर्मिती, भारतात डिझाइन) या संकल्पनेचा पुनरुच्चार करत देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका मोठ्या यशाची माहिती दिली आहे

भारतातील टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत २५० पेक्षा जास्त सेमीकंडक्टर चिप्स डिझाइन केल्या आहेत. भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्यासाठी आणि केवळ ‘मेक इन इंडिया’ नव्हे तर ‘डिझाइन इन इंडिया’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही संकल्पना राबवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत केवळ ४-५ वर्षांचा विचार न करता पुढील २० वर्षांचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून संपूर्ण सेमीकंडक्टर इकोसिस्टम विकसित करत आहे.
गेल्या चार वर्षांत भारतात तब्बल ८५,००० सेमीकंडक्टर अभियंते (Semiconductor Engineers) तयार करण्यात आले आहेत. ‘सेमीकॉन २.०’ (Semicon 2.0) या नवीन टप्प्यांतर्गत आणखी १ लाख डिझाइन इंजिनिअर्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.