Friday, October 18, 2024

डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात केला ‘कन्या सन्मान’

Share

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील (Dr. Ketki Patil) यांच्या संकल्पनेतून आणि बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळ, आंबेडकर नगर, जुने जळगाव यांच्या सहकार्याने जुने जळगावात ९ ऑक्टोबर बुधवार रोजी ‘कन्या सन्मान’ (Kanya Sanman) कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात घेण्यात आला. या प्रसंगी उपस्थित कन्याचे पाय धुवून त्यांना मिष्टान्न देऊन तसेच टिफीन, प्रत्येकी ५ वही, नेलपॉलिश, टिकली आदी साहित्य वितरित करण्यात आले. या कन्या सन्मानाचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या उपक्रमामुळे उपस्थित बालिकांचे पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, रमाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून कन्या सन्मानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा, भाजपा महिला मोर्चा महानगर प्रमुख भारती सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, नंदा सोनवणे, खुशबू बनसोडे, जिजाबाई सोनवणे, ज्योती सोनवणे, कविता सोनवणे, सोनाली सोनवणे, प्रकाश सोनवणे, मयूर सोनवणे, कमलाकर बनसोडे, किरण सोनवणे, मोहित बनसोडे, राहुल सोनवणे, सचिन सोनवणे, शरद सपकाळे उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख