Friday, July 3, 2026

त्रिभाषा श्रीमद्भगवद्गीता… गोरखपूर प्रेसचा स्तुत्य उपक्रम

Share

गोरखपूरच्या गीता प्रेसने त्यांच्या १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीमद्भगवद्गीतेची त्रिभाषी (Trilingual) आवृत्ती प्रकाशित केली आहे… या एकाच पुस्तकात संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांचा समावेश करण्यात आला आहे…

श्रीमद्भगवद्गीतेच्या या नव्या आवृत्तीत प्रत्येक श्लोकाची मांडणी अत्यंत सोप्या पद्धतीने केली आहे… सर्वात आधी मूळ श्लोक संस्कृत भाषेमध्ये दिला आहे… नंतर ज्यांना देवनागरी लिपी वाचता येत नाही, त्यांच्यासाठी श्लोक रोमन लिपित अर्थात इंग्रजी अक्षरात दिले आहे, जेणेकरून श्लोकांचे शुद्ध उच्चारण करता येईल… त्यानंतर श्लोकाचा सोपा हिंदी अनुवाद दिला आहे… शेवटी त्याचा इंग्रजी भाषेतील अर्थ देण्यात आला आहे…

 ही आवृत्ती उत्कृष्ट दर्जाच्या आर्ट पेपरवर ग्रंथाच्या आकारात छापली जात आहे… श्लोकांचा संदर्भ समजण्यासाठी पुस्तकात काही निवडक आणि आकर्षक चित्रांचा समावेश केला आहे…

आजची तरुण पिढी आणि देशाबाहेरील लोक ज्यांना हिंदी किंवा देवनागरी वाचता येत नाही, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे…

गोरखपूर प्रेसचा हा तरुणांसाठी आणि विशेषतः Gen Z साठी खूपच उपयुक्त ठरणार आहे…

अन्य लेख

संबंधित लेख