लातूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रमुख नेत्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची नुकतीच भेट झाली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि अटकळांना उधाण आले. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात विविध अर्थ काढले जात आहेत. आंबेडकर यांच्या राज्यात सुरू असलेल्या ‘आरक्षण बचाव’ मोर्चादरम्यान ही भेट झाली.
प्रकाश आंबेडकर हे आज लातूरवरुन (Latur) बीडकडे निघाले होते. याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड (Beed) आणि लातूरच्या मध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली. मात्र राजकीय वर्तुळात या भेटीमध्ये वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत
गेल्या काही दिवसापासून राज्यभरात मराठा आणि ओबीसी आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळायला हवं यासाठी मनोज जरंगे हे उपोषण केलं आहे. तर, दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं होतं. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलंय.
- बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर
- स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १
- मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश