शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक मर्यादा यामुळे अनेक कुटुंबांचे जीवन संघर्षमय झाले आहे. लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ते दुसऱ्याची शेती बटाई करत होते. बैल नसल्यामुळे शेताची मशागत करण्यासाठी काशिनाथ गायकवाड यांच्या पत्नीला स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन नांगरणी करावी लागत होती. आधुनिक महाराष्ट्रात एका शेतकरी महिलेला बैलाऐवजी स्वतः नांगर ओढावा लागत असल्याचे दृश्य अनेकांच्या मनाला चटका लावणारे होते. बातमी वाऱ्यासारखी मिडीया आण सोशल मिडीयावर पसरली. घटनेने समाज हळहळले.
या घटनेची बातमी आणि छायाचित्रे माध्यमांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहोचले. मुख्यमंत्र्यानी तात्काळ दखल घेतली. राज्यातील लाखो नागरिकांच्या प्रश्नांमध्ये एका दुर्गम भागातील भूमिहीन शेतकरी कुटुंबाची व्यथा त्यांनी गांभीर्याने ऐकली आणि प्रशासनाला तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले.त्यांला शेतकरी तात्काळ बैल दिला. आणि त्या शेतकरी मातेच्या खाद्यावरील जू खाली उतरवले. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील ची साक्ष देणारी आहे.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने हालचाल केली. अल्पावधीतच गायकवाड कुटुंबाला बैल उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर आर्थिक मदतीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली. ज्या कुटुंबाला शेतीच्या कामासाठी मानवी श्रमांचा आधार घ्यावा लागत होता, त्या कुटुंबाच्या आयुष्यात या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. गायकवाड कुटुंबानेही शासनाच्या त्वरित मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
लोकशाही व्यवस्थेत नेतृत्वाचे खरे मूल्यांकन हे केवळ मोठ्या घोषणा, प्रकल्प किंवा भाषणांवर होत नाही. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर किती तत्परतेने उपाय केले जातात, यावर नेतृत्वाची खरी ओळख ठरते. लातुर येथील ही घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीतील संवेदनशीलता आणि निर्णयक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.मात्र, या घटनेनंतर एक चिंताजनक प्रवृत्तीही समोर येत आहे. राज्यातील काही भागांत जाणीवपूर्वक जू खांद्यावर घेऊन नांगरणी करतानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. एखाद्या गरजू शेतकरी कुटुंबाला मदत मिळाल्यानंतर तशीच सहानुभूती आणि मदत मिळविण्यासाठी काही जण अशा प्रकारचे स्टंट करत असल्याची चर्चा होत आहे. अशा कृत्रिम प्रकारांमुळे खऱ्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच समाजातही प्रत्येक अशा घटनेकडे संशयाने पाहिले जाऊ लागते, जे खऱ्या गरजूंना अन्यायकारक ठरते.शेतकऱ्यांच्या वेदना या प्रसिद्धी मिळविण्याचे साधन नसून त्या सोडविण्याची सामूहिक जबाबदारी आहेत. शासनाची संवेदनशीलता ही गैरफायदा घेण्यासाठी नसून खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी आहे.
लातुर येथील गायकवाड कुटुंबाला मिळालेली मदत ही एका कुटुंबापुरती मर्यादित घटना नाही. ती शासनातील संवेदनशीलता, लोकाभिमुखता आणि कार्यतत्परतेचा संदेश देणारी घटना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले की, शासनाची खरी ताकद मोठ्या घोषणांमध्ये नसून समाजातील शेवटच्या घटकाच्या अश्रूंना ओळखून त्याला वेळेवर मदतीचा हात देण्यात असते. त्याचवेळी समाजानेही या संवेदनशीलतेचा गैरफायदा न घेता खऱ्या गरजूंना न्याय मिळेल यासाठी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
“शासनाची लगेच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता खरीपातील कामे पुर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल ही चांगला मिळाला आहे. ”
– शेतकरी हौसाबाई गायकवाड
– अरूण कराड