Monday, August 31, 2026

प्रशासकीय कार्यालयांतील टिपू सुलतानच्या छायाचित्रांवरून वाद

Share

राज्यातील सातत्याने कुरकर्मा टिपू सुलतानाच्या नाव आणि फोटोवरुन वाद निर्माण होत असतात, त्यातच महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मालेगाव महापालिकेत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यासंदर्भाने केलेल्या वक्तव्यावरुन आणि फोटो लावण्यावरुन गदारोळ झाला होता. त्यानंतर, आता येथील मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. उपमहापौर शान ए हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतान याचा फोटो लावला आहे. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 

        यावर AMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याला त्यांनी समर्थन दिले. फोटो काढण्याची मागणी करणाऱ्यांना त्यांनी “हिंमत असेल तर तो फोटो काढून दाखवा”,असे थेट आव्हान दिले.त्यांच्या भूमिके चा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये टिपू सुलतान यांचे चित्र असल्याचा त्यांनी दावा केला. याच मुद्द्यावर त्यांनी भाजप व शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

           सरकारने यावर गांभीर्याने विचार करून इम्तियाज जलीलच्या आव्हानाला उत्तर म्हणून टिपू सुलतानचा फोटो काढून टाकायला काय हरकत आहे. हजारो हिंदूंच्या कत्तली आणि धर्मांतरण करणाऱ्या कुरकर्म्याचे छायाचित्र सरकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीत कशाला हवे आहेत. भाजपा आणि शिवसेना यांनी हे छायाचित्र काढून टाकण्या साठी कडक आदेश दिले पाहिजेत. तसेच संसदेतील भारतीय संविधानात असलेली कुरकर्मा टिपू सुलतानचे छायाचित्र सरकार का काढून टाकत नाही. असा प्रश्न देशभक्त नागरिक विचारत आहे. सरकार नेमकं कुणाला घाबरत आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख