Tuesday, September 8, 2026

संभाजीनगरमध्ये विद्यादान करणाऱ्या दलित शिक्षक दांपत्याचा धर्मांतरासाठी छळ

Share


दलित शिक्षक पती-पत्नी उभयतांना नोकरीत कायम करण्याचे आमीष दाखवून तब्बल दोन वर्षे पगार न देता धर्मांतरासाठी छळ केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. हे ख्रिस्ती धर्मसेवक या दांपत्याचा छळ करून थांबले नाहीतर त्यांच्याकडून या फादरनी पाच लाख रुपये उकळले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात हा गुन्हा घडला आहे. पीडित शिक्षकाच्या फिर्यादीवरून विरगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध २८ ऑगस्ट रोजी अमलात आलेल्या नवीन महाराष्ट्र धार्मिक स्वातंत्र्य कायदा, २०२६ गुन्हा दाखल झाला आहे.
सन २०२४ पासून शांतिसदन प्राथमिक शाळेतील बाळासाहेब आप्पासाहेब साठे आणि त्यांची पत्नी पूजा हे शिक्षक होते. तेव्हा फादर जेरल्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा धर्मांतर करण्यासाठी मानसिक छळ सुरू केला. छळाचा परिणाम होत नाही हे बघून नोकरीत कायम करण्याच आमीष दाखविले पाच लाख रुपये उकळले. यथावकाश या दांपत्यचा स्थानिक चर्चमध्ये बाप्तिस्मा करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस ठाण्यात नोंदवला गेलेला गुन्हा हा केवळ एका शिक्षक दांपत्याच्या वैयक्तिक शोषणाचा विषय उरलेला नाही. कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून एका शिक्षक पती-पत्नीचे धर्मांतर घडवून आणणे, त्यानंतर दोन वर्षे त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेणे आणि नोकरीच्या बदल्यात तब्बल पाच लाख रुपयांची उकळती करणे, हा प्रकार सामाजिक, नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या अत्यंत संतापजनक आहे. मानसिक तणावातून शिक्षकाने घेतलेला बेपत्ता होण्याचा निर्णय आणि त्यानंतर उघडकीस आलेली ही पार्श्वभूमी आपल्या शिक्षण व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि धर्मांतराच्या आड चालणाऱ्या संस्थात्मक शोषणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

शोषणाचे नवे पद्धतीशास्त्र : असहायतेचा गैरवापर

ग्रामीण आणि निमशहरी भागात खाजगी शिक्षण संस्थांमध्ये किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक आर्थिकदृष्ट्या अत्यंत असुरक्षित स्थितीत काम करतात.या असहायतेचा फायदा घेऊन स्थानिक स्तरावर दलित आणि मागास समाजाचं शोषण करण्याच प्रमाण मोठं आहे. या शोषणाबरोबर धर्मांतराचा मार्ग दाखवून दलित समाजाला धर्मातर करण्याला भाग पाडायचं हा नित्यक्रम चर्च सारख्या संस्थानकडून राजरोस होताना दिसतो. धर्मातरासाठी ‘कायमस्वरूपी नोकरी असो वा संस्थात्मक आमिषे किंवा आर्थिक दबाव ही मुख्य शस्त्र अनेक वर्षांपासून बनली आहेत.
नोकरीची अट : सेवा शर्तींच्या नावाखाली किंवा पदोन्नतीच्या मोबदल्यात विशिष्ट धर्माचा स्वीकार करण्याची अट घालणे हा थेट मानवी हक्कांवर आणि राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यावर घाला आहे.
आर्थिक पिळवणूक : सुरुवातीला विनामोबदला काम करून घेणे (Unpaid Labour) आणि नंतर नोकरी कायम करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करणे, हे चक्र संबंधित कर्मचाऱ्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करते.
आरोग्य आणि वैद्यकीय आमिषे : ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असतो. याचा फायदा घेऊन ‘प्रार्थनेने आजार बरे होतात’ (Faith Healing) असा दावा करणाऱ्या ‘चंगाई सभा’ किंवा ‘हीलिंग मीटिंग्स’ आयोजित केल्या जातात. आजारपणाने ग्रासलेल्या कुटुंबांना अशा सभांकडे आकर्षित केले जाते.
शैक्षणिक व सामाजिक आमिषे : मोफत शिक्षण, वसतिगृह आणि नोकरीची हमी देऊन कुटुंबांचे धर्मांतर घडवून आणले जाते.
कौटुंबिक दबाव: कुटुंबातील एका मुख्य कमावत्या सदस्याला जाळ्यात ओढले की, त्याच्या नोकरीचा किंवा उत्पन्नाचा धाक दाखवून संपूर्ण कुटुंबाचे धर्मांतर घडवून आणले जाते.
यापद्धतीने अनेक कुटुंबांवर ही संस्था दबाव आणत असणार हि शक्यता नाकारता येत नाही. फक्त ही संस्थाच नाही तर या संस्थेशी संलग्न असलेल्या संस्थाची कसून चौकशी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये येणारी चर्च व्यवस्था या सर्व प्रकाराला कारणी भूत आहेच. तेव्हा या सगळ्यांची कसून चौकशी झाल्याशिवाय या प्रकरणामध्ये गुंतलेल्यांचे धागेदोरे सापडणार नाहीत.

भारतातील जनगणनेतील धार्मिक लोकसंख्येची आकडेवारी (१९५१ – २०११) 

स्रोत: https://indianexpress.com/article/india/1687-people-changed-religion-in-maharashtra-in-nearly-4-years-rti-5037949/

जनगणना वर्षहिंदू लोकसंख्या (%)मुस्लिम लोकसंख्या (%)ख्रिश्चन लोकसंख्या (%)बौद्ध लोकसंख्या (%)
१९५१८४.१%९.८%२.३%०.०५%
१९६१८३.४%१०.७%२.४%०.७४%
१९७१८२.७%११.२%२.६%०.७०%
१९८१८२.६%११.४%२.४%०.७१%
१९९१८१.५%१२.६%२.३%०.७६%
२००१८०.५%१३.४%२.३%०.७७%
२०११७९.८%१४.२%२.३%०.७०%

अन्य लेख

संबंधित लेख