गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण-सावंतवाडीसाठी ‘नमो एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “गणेश चतुर्थीच्या निमित्ताने लोकांना आपल्या कुटुंबीयांसह आणि सामानासह गावी जाण्याची इच्छा असते. गणपतीचा उत्सव हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. अनेकदा सणासुदीच्या काळात रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण जाते आणि कुटुंबांकडे बऱ्याच प्रमाणात सामानही असते; म्हणूनच प्रवासाची ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.”
गणपती उत्सवासाठी गावी जाऊ इच्छिणाऱ्या कोणालाही कोणतीही गैरसोय किंवा अडचण येऊ नये, हे सुनिश्चित करणे हा आमचा उद्देश आहे.
असे लोढा यावेळी बोलताना म्हणाले.
आज दोन गाड्या रवाना होत आहेत आणि वाहतुकीच्या इतर विविध माध्यमांतूनही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गाड्या यापूर्वीच रवाना झाल्या आहेत आणि आणखी काही गाड्या सुटणार आहेत. अशी खात्री त्यांनी यावेळी बोलताना दिली.
हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आपल्या लोकांना गावी जाताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, ही आमची प्राथमिकता आणि जबाबदारी आहे. असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर दिला आहे.