Monday, December 30, 2024

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे

Share

हिंदू समाजाच्या सणावरच दगडफेक का होते ? मात्र, मुस्लिमांचे सण होत असताना कुठलाच वाद होत नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. आज जी अचलपूर शहरात दहशत निर्माण झाली. ती दहशत एक दिवस नव्हे ३६५ दिवस असायला हवी. हिंदूकडे वाकड्या नजरा करुन पाहणाऱ्यांचे थोबडा ओळखू यायला नको. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, आमच्या नादी लागाल तर याद राखा, असा इशारा भाजपचे आ. नितेश राणे यांनी दिला.

अचलपूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेत प्रमुख वक्ते भाजपचे आ. नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून जोरदार प्रहार केले.

सभेपूर्वी अचलपूर-परतवाडा शहरात हिंदू समाज आक्रोश रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चांदूरबाजार नाक्यावर रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो युवक मोटरसायकलवर भगवे झेंडे घेत दुपारपासून एकत्रित येत होते. भाजप आमदार नितेश राणे यांचे आगमन होताच जय श्रीराम च्या घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. 

आम्हाला महाराष्ट्रात वादंग निर्माण करायचा नाही. मात्र, जिहादी विचाराचे काही लोक त्यांच्या रॅलीतून अतिरेक्यांचा जयजयकार करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी या सभेतून दिला. त्यांनी अकोला व अकोट येथील जल्लोषाचाही उल्लेख केला. या सभेला मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही सभा व रॅली शांततेत पार पडली. 

नितेश राणे यांची बाईक रॅली फेसबुक पेजवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आली. ज्यामध्ये काही लोकांनी एका विशिष्ट समाजावर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. ही बाब सायबर क्राईम पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. परतवाडा पोलिस ठाण्यात – गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याला प्रत्युत्तर म्हणून जर कुणी अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख