भोकर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सबंध महिलांना परंपरागत चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना व्यक्त केले. ते भोकर शहरातील नवा मोंढा येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.अजित गोपखेडे, माजी आमदार अमर राजुरकर, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, समाज कल्याण उपआयुक्त शिवानंद मेनगिरे, उपजिल्हाधिकारी बोरगावकर, माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण आदींची उपस्थिती होती.
देशात व राज्यात महायुतीचे शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटत आहे. महिलेचे जीवनमान सुधारावे तसेच महिला या अबला नसून त्या सबला बनल्या पाहिजेत म्हणून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या विविध योजना राबवून महिलांना मानाचे स्थान प्राप्त करून देत आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या प्रयत्नांतुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करून रक्षाबंधनाच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या बॅंक खात्यावर तीन हजार रुपये पाठवून त्यांना राखी पौर्णिमेची भाऊ भेट दिली आहे. ही योजना महाराष्ट्रात कायमस्वरूपी चालणार असून प्रत्येक महिलांच्या खात्यावर दर महिना दीड हजार रुपये येणार आहेत. काही विरोधक अफवा पसरवित असून ही योजना केवळ निवडणुकीपुरती व फसवी आहे. तेव्हा त्यांच्या अफवेला कोणीही बळी पडू नका ही योजना कोणीही बंद करू शकत नाही. असे उपस्थित महिलांना त्यांनी आत्मविश्वास दिला.
या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनीही महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महायुतीचे सरकार जे बोलते ते करून दाखवते. राखी पौर्णिमेच्या अगोदर आम्ही तुमच्या खात्यावर तिन हजार रुपये पाठवले आहेत. आम्ही तुमच्या विकासासाठी २४ तास तुमच्या पाठीमागे उभे आहोत तेव्हा तुम्हीही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. भोकर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुमचाही हातभार असु द्या असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात खा.डॉ.अजित गोपछडे, श्रीजया चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनेचा उहापोह करून महिलांच्या उन्नतीसाठी शासन राबवीत असलेल्या विविध विकास योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले. यावेळी काही लाभधारक महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राखी पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर ओवाळणी म्हणून तिन हजारची भाऊभेट पाठवली त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगितले. तसेच या कार्यक्रमात लाभधारक महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले.या कार्यक्रमास तालुक्यातून हजारो महिला आपल्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून आल्याने वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते.
- महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा?
- पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्च 2025 पर्यंत सुरू होणार
- महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
- उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम
- बच्चू कडूंनी विश्वासघात केला, महायुतीत समावेश नको – राधाकृष्ण विखे पाटील