Sunday, October 4, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याच्या सूचना

Share

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. बावनकुळे यांनी अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर (करमाड) आदी भागांचा दौरा केला. 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहिर झाले आहेत. दुष्काळाची झळ बसलेल्या 15 ते 20 तालुक्यांचाही समावेश करण्याचा विचार झाला असून त्याबद्दलचे निर्देश लवकरच देण्यात येतील असेही ते म्हणाले.

अचूक आणि तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कृषी अधिकाऱ्यांसह इतर महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. कारण अचूक पंचनामेच्या माध्यमातून निश्चितच केंद्र सरकारकडून देखील मदत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारची वाट न पाहता राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाऊले उचलणार. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काय मदत देता येईल, याचा विचार मुख्यमंत्री आणि सरकार करते आहे. असेही ते म्हणाले.

सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना केली. असल्याचे बावनकुळे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. बुलढाणा येथील श्री मरदाडी माता मंदिराला भेट दिली आणि मातेचे दर्शन घेतले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत आमदार अनुराधा चव्हाण यांनी सटाणा फाटा, ता.छत्रपती संभाजीनगर येथे दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.

नुकसानीची माहिती घेऊन सर्व अचूक पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या अडचणी आणि नुकसानीबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला.

यावेळी आमदार श्री.नारायण भाऊ कुचे, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.रामबाबा शेळके, खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री.भाऊराव मुळे, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री.सुदाम ठोंबरे यांच्यासह शेतकरी बांधव, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख