स्वामी विवेकानंद यांनी ४ जुलै १९०२ रोजी महासमाधी घेतली. त्यांचे वय त्यावेळी 39 वर्ष होत. एवढ्या कमी वयात विवेकानंदानी ही समाधी घेतली , याचं कारण त्यांनीच स्वतः आपल्या शिष्यांना अनेकदा सांगितलं होतं. ते म्हणत , “हा देह आता या आत्म्याची ऊर्जा जास्त काळ सहन करू शकत नाही”.
स्वामीजींचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांनी स्वामीजींच्या म्हणजेच नरेंद्रनाथांच्या बाबतीत एक भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते, “ ज्या दिवशी नरेंद्रला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची पूर्ण जाणीव होईल. त्या दिवशी तो आपला देह ठेवण्यास नकार देईल त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर तो स्वतःहून समाधी घेईल.”
19 व्या शतकात जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीत होता आणि इंग्रजांनी भारतात प्रवेश हा बंगाल मधून केला होता. तेव्हा भारताच्या आध्यात्मिक क्षितिजावर स्वामी विवेकानंद या तेजस्वी संन्याशाचा उदय झाला. स्वामी विवेकानंद या साहसी संन्याशाने प्राचीन हिंदू धर्माच्या व हिंदू संस्कृतीच्या आकृतीबंधाची मांडणी जागतिक पटलावर ठेवून जागतिक धर्माच्या , संस्कृतीच्या संकल्पनांना फक्त आव्हान दिले नाही. तर त्या सर्वांना धर्म व संस्कृती द्वारे सुसंस्कृत केले आणि जागतिक अध्यात्माची दिशा बदलली.
स्वामी विवेकानंदांचा जन्म
स्वामी विवेकानंद यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता. त्या काळात बंगालला जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे बंगालमध्ये जगातले व्यापारी आणि तत्त्वज्ञ यांचा वावर होता. स्वामी विवेकांनदांच्या जन्मापूर्वी १७७० नंतर बंगालला दुष्काळाच ग्रहण लागल. जवळपास बंगालच्या तीन करोड लोकसंख्येला या दुष्काळाने ग्रासलं.
या पार्श्वभूमीवर स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या रामकृष्ण मिशन यांनी कोट्यावधी भुकेलेल्या जनतेला प्रथम अन्नदान दिल. मग परमात्म्याचे ज्ञान देण्याचा महायज्ञ सुरू केला. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत, “ जीवांवर दया ? तुच्छ मानव जीवांवर दया करणारा कोण ? दया नव्हे तर शिवभावाने जीवांची सेवा करा.”
हाच मंत्र स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर जपला. त्यांनी ‘शिवभावे जीव सेवा’ हा मंत्र जगाला दिला.
स्वामी विवेकानंद म्हणत,
“ जोपर्यंत माझ्या देशातील एकही व्यक्ती भुकेलेली आहे तोपर्यंत प्रत्येक देश वासी जो स्वतःला सुशिक्षित म्हणवतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला मी देशद्रोही मानतो.”
शिकागो मधली ‘जागतिक धर्म परिषद’ ही ख्रिश्चन धर्मगुरूंसाठी आंदण दिली होती. जागतिक पटलावर ख्रिश्चन धर्म हा सर्वव्यापी आहे, व तोच जगाच कल्याण करू शकतो, हे पटवण्यासाठी व जागतिक धर्मांतर व्यवस्थेला वेग देण्यासाठी ही जागतिक धर्म परिषद आयोजित केले होती. स्वामी विवेकानंद यांनी या परिषदेतून जगाचे लक्ष एका हिंदू संन्याशावर खेळवून ठेवण्यास भाग पाडलं. कारण हिंदू धर्माचा मूळ विचार हा जेव्हा संन्यासी उद्धृत करतो. तेव्हा हिंदू धर्माच्या सनातन तेजाने सकल मनुष्यमात्र स्वयंप्रकाशित होतो.
ख्रिश्चन धर्मगुरूंनी पूर्वी इतिहासात ‘राईस ख्रिश्चन्स’ (Rice Christians) म्हणजे पोटाची भूक भागवण्यासाठी जबरदस्तीने किंवा नाईलाजाने जे लोक धर्मांतरित झाले त्या लोकांना जगण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला त्यांना राईस ख्रिश्चन ही संकल्पना वापरली जाते…….
रामकृष्ण परमहंसांनी ‘नराची सेवा हीच नारायणाची सेवा’ हा मंत्र दिल्याने रामकृष्ण मिशन यांनी अन्नदान व ज्ञानदान यालाच प्रथम स्थान दिल. त्यातूनच स्वामी विवेकानंदांचा पिंड जोपासला गेला.
रामकृष्ण मिशनचे स्वयंसेवक बांगलादेश मध्ये जेव्हा-जेव्हा पूर, वादळ किंवा उपासमारीचे परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा रामकृष्ण मिशनच्या स्वयंसेवकांनी तिथे छावण्या उभारल्या.
मिशनचा बोधवाक्य होतं.
“आम्ही तुम्हाला अन्न देत आहोत कारण तुम्ही आमचे बांधव आहात, तुमच्यात ईश्वर आहे; आम्ही तुमच्याकडून कोणत्याही धर्मांतराची किंवा बदल्याची अपेक्षा करत नाही.”
स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना मंत्र दिला
‘उत्तिष्ठ भारत जाग्रत भारत’ (उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत )
भारतातला तरुण हा सनातन हिंदू संस्कृतीच्या प्रकाशाने स्वयंप्रकाशित होऊन जगाला प्रकाशित होण्यासाठी मार्ग दाखवेल हेच आजच्या पुण्य स्मरणाच फलित !
स्वामी विवेकानंद या हिंदू योद्धा संन्याशाला आजच्या पुण्य स्मरण दिनी शत शत वंदन!