कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, चित्रपट, आरोग्य अशा बहुविध विषयांना स्पर्श करणारा मुंबई बुक फेस्टिवलचे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्यावतीने आयोजित ‘मुंबई बुक फेस्टिव्हल 2026’च्या लोगो आणि अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण केले. हा सहा दिवसीय महोत्सव 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये होणार असून, यामध्ये पुस्तके, साहित्य, कला आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
यावेळी आमदार अमीत साटम, राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारतचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात लिटररी अवॉर्डस अंतर्गत जीवनगौरव, कथा, कविता, नॉन-फिक्शन आणि व्यावसायविषयक पुस्तकांसाठी पुरस्कार प्रदान केले जातील. याव्यतिरिक्त विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, पुस्तकांचे प्रकाशन आणि पुस्तकांची देवाणघेवाण असे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. गोदरेज डीईआय लॅबच्या माध्यमातून सर्वसमावेशकतेवर भर दिला जाईल. तसेच विविध विषयावर चर्चासत्रे आयोजित केले जातील.