महाराष्ट्र : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांची (Guardian Minister) आणि सह – पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 18 जानेवारी रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, ज्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे, कारण पूर्वी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) होते. या निर्णयामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
- ठाणे – एकनाथ शिंदे
- मुंबई शहर – एकनाथ शिंदे
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
- अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
- वाशिम – हसन मुश्रीफ
- सांगली – चंद्रकांत पाटील
- नाशिक – गिरीश महाजन
- पालघर – गणेश नाईक
- जळगाव – गुलाबराव पाटील
- यवतमाळ – संजय राठोड
- मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
- रत्नागिरी – उदय सामंत
- धुळे – जयकुमार रावल
- जालना – पंकजा मुंडे
- नांदेड – अतुल सावे
- चंद्रपूर – अशोक उईके
- सातारा – शंभूराज देसाई
- रायगड – आदिती तटकरे
- लातूर – शिवेंद्रराजे भोसले
- नंदूरबार – माणिकराव कोकाटे
- सोलापूर – जयकुमार गोरे
- हिंगोली – नरहरी झिरवाळ
- भंडारा – संजय सावकारे
- छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
- धाराशिव – प्रताप सरनाईक
- बुलढाणा – मकरंद जाधव
- सिंधुदुर्ग – नितेश राणे
- अकोला – आकाश फुंडकर
- गोंदिया – बाबासाहेब पाटील
- कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
- वर्धा – पंकज भोयर
- परभणी – मेघना बोर्डिकर
राज्यातील पालकमंत्र्यांच्या या नव्या यादीमुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढेल आणि जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.