Tuesday, February 24, 2026

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा

Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पार्थ पवार यांची नवी इनिंग
सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत असून, त्यांच्या कार्यकाळाची अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. मात्र, पार्थ पवार यांना या उर्वरित कालावधीसाठी न पाठवता, पूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ असलेल्या नवीन जागेवरून राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहेत. २०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार आता थेट दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पार्थ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, त्यांना ६ वर्षांचा पूर्ण कार्यकाळ असलेल्या जागेवरून पाठवले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आता दिल्लीच्या राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा दोन वर्षांचा कार्यकाळ (४ जुलै २०२८ पर्यंत) अद्याप शिल्लक आहे. मात्र, पार्थ पवार यांना या उर्वरित अल्प कालावधीसाठी न पाठवता, पूर्ण सहा वर्षांची मुदत असलेल्या नवीन जागेवरून राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली पक्षाने सुरू केल्या आहेत. २०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार आता थेट संसदेत सक्रिय होणार असून, प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जातंय.

सुनेत्रा पवार होणार ‘राष्ट्रीय अध्यक्ष’
याच बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक रचनेवरही चर्चा झाली. येत्या २६ फेब्रुवारीला वरळी येथील डोममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवड केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षानेही आपल्या ४ जागांसाठी उमेदवारांची चाळणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री होणाऱ्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब होईल. भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांचे नाव निश्चित मानले जात असून, उर्वरित तीन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

विजेतेपदाचे गणित (Quota Calculation)
विद्यमान विधानसभेच्या २८६ आमदारांच्या संख्याबळानुसार, राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता आहे.

महायुती: भाजप (१३१), शिंदे गट (५७) आणि राष्ट्रवादी (४०) यांच्याकडे एकत्रित २३४ मते आहेत. यामुळे महायुतीचे ६ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

महाविकास आघाडी: मविआकडे ४९ आमदारांचे बळ असून, त्यांचा केवळ १ उमेदवार निवडून येऊ शकतो.

अन्य लेख

संबंधित लेख